पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकावर होणाऱ्या अत्याचारांसंदर्भातील आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथील सिंध प्रांतांमध्ये एका १८ वर्षीय मुलीवर गोळ्या झाडून तिची हत्या करण्यात आलीय. सुक्कुर शहरामधील रोही परिसरात हा सर्व धक्कादायक प्रकार घडलाय. या तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आलेल्या. मात्र तो अयशस्वी ठरल्याने अपहरणकर्त्यांनी तिच्यावर गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरुन पळ काढला. मृत्यू झालेल्या मुलीच नावं पुजा ओड असं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फ्रायडे टाइम्स या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार पुजाचं अपहरण करण्याचा प्रयत्न काहीजणांनी केला. त्याला तिने विरोध केला असता तिच्यावर गोळीबार करण्यात आलाय. धक्कादायक बाब म्हणजे हा सारा प्रकार दिवसाढवळ्या भररस्त्यात घडला.

पोलिसांनी या प्रकरणाचा पंचानामा सुरु केला असून हल्लेखोरांचा शोध ते घेत आहेत.

अशाप्रकारे पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक समुदायामधील महिलांवर हल्ला होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. खास करुन सिंध प्रांतामध्ये अनेकदा हिंदू माहिलांचं अपहरण करण्याच्या घटना घडतात. या महिलांचं अपहरण करुन अनेकदा त्यांना धर्मांतर करण्यास भाग पाडलं जातं.

पाकिस्तानमधील सराकरी आकडेवारीनुसार २०१३ ते २०१९ दरम्यान बळजबरीने धर्मपरिवर्तन घडवून आणल्याचे १५६ प्रकार सिंध प्रांतामध्ये घडलेत. पाकिस्तानमधील एकूण लोकसंख्येपैकी १.६० टक्के हिंदू लोकसंख्या आहे. तर सिंध प्रांतामधील एकूण लोकसंख्येच्या ६.५१ टक्के लोक हिंदू आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An 18 year old hindu girl shoot dead in pakistan scsg