कर्नाटकच्या मंगळुरूमध्ये ऑटोमध्ये अचानक स्फोट झाल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेत ऑटोचा चालक आणि प्रवासी जखमी झाले आहेत. या स्फोटाच्या कारणांचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. या घटनेच्या व्हिडीओमध्ये सुसाट ऑटो रस्त्यावर थांबत असताना हा स्फोट झाल्याचे दिसून येत आहे. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या शेजारी या ऑटोनं अचानक पेट घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई: लोकल प्रवाशांचे आज ‘मेगाब्लॉक’मुळे हाल; कर्नाक उड्डाणपूल पाडकाम सुरू

“हा स्फोट का झाला याबाबत आत्ताच निष्कर्ष काढणं घाईचं ठरेल. घटनेतील जखमी चालक आणि प्रवाशांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून ते बोलण्याच्या स्थितीत नाही. या घटनेविषयी नागरिकांनी अफवा पसरवू नये. त्यांनी शांत राहावं आणि घाबरू नये”, असे आवाहन मंगळुरु पोलीस आयुक्त एन. शशीकुमार यांनी केले आहे.

‘अ‍ॅण्ड’ हा आपल्या नावाचा भाग आहे, असं तब्बसूम यांना का वाटायचं? जाणून घ्या रंजक गोष्ट

एका प्रवाशाजवळ असलेल्या प्लॉस्टिकच्या पिशवीनं पेट घेतल्यानं हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या स्फोटाच्या कारणांचा नेमका खुलासा अद्याप झालेला नाही. या प्रकरणात मंगळुरू पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येत आहे. प्रवाशाकडे असलेल्या प्लॉस्टिक पिशवीतील साहित्याचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरुन नमुने गोळा केले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An autorickshaw exploded in karnatakas mangalore police is investigating cause of fire rvs