Army Chief Upendra Dwivedi Warns Pakistan: ऑपरेशन सिंदूरनंतर, भारताची पाकिस्तानविरुद्धची भूमिका आणखी कठोर झाली आहे. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शुक्रवारी गंगानगरमधील घडसाणातील गावांना भेट दिली आणि येथून पाकिस्तानला इशारा दिला. ते म्हणाले की, जर पाकिस्तानला नकाशावर दिसायचे असेल तर दहशतवाद्यांना मदत करणे थांबवावे लागेल.

भारतीय लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला कठोर इशारा देत म्हटले आहे की, जर त्यांनी दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवले नाही तर ते नकाशावरून पुसले जाऊ शकतात. इतकेच नाही तर ते म्हणाले की यावेळी भारतीय लष्कर पाकिस्तानविरुद्ध कोणताही संयमाची भूमिका घेणार नाही.

जर पाकिस्तानने दहशतवाद थांबवला नाही तर भारत ऑपरेशन सिंदूरचा दुसरा टप्पा सुरू करेल असे भारतीय लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी सांगितले. ते म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर १.० दरम्यान भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. या कारवाईत सुमारे पाकिस्तानी सैनिक आणि अनेक दहशतवादी मारले गेले होते. त्यांनी पुढे सांगितले की, ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे श्रेय लष्कराचे जवान आणि स्थानिक लोकांना जाते.

जर पाकिस्तानने भारतविरोधी कारवाया केल्या तर आम्ही पाकिस्तानला जगाच्या नकाशावर राहायचे आहे की नाही याचा पुनर्विचार करण्यास भाग पाडू, असे लष्करप्रमुख जनरल द्विवेदी म्हणाले. ते म्हणाले की, पाकिस्तानचा सरकार पुरस्कृत दहशतवाद नष्ट केला पाहिजे.

पाकिस्तानची लढाऊ विमाने पाडली

तत्पूर्वी, भारतीय हवाई दलाच्या ९३ व्या स्थापना दिनाच्या समारंभानंतर, एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरबद्दल महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर दरम्यान ४-५ पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली, कदाचित त्यामध्ये एक एफ-१६ देखील नष्ट झाले असावे. पाकिस्तानविरुद्ध सुरू केलेले ऑपरेशन सिंदूर हे तिन्ही सैन्यांमधील समन्वयाचे प्रतिबिंब होते, हा पराक्रम जगाने पाहिला आहे.”

एअर चीफ मार्शल पुढे म्हणाले, “पहलगाममध्ये घडलेल्या घटनेनंतर, आम्ही निर्णय घेतला की निष्पाप लोकांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानला त्यांच्या कृत्यांची किंमत चुकवावी लागेल. सशस्त्र दलांना स्पष्ट सूचना आणि स्पष्ट आदेश देण्यात आले होते आणि यात भारतीय हवाई दलाची भूमिका महत्त्वाची होती.”