इस्लामाबाद : तोशाखाना प्रकरणात चौथ्यांदा सत्र न्यायालयात हजर न राहिल्याबद्दल पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरुद्ध जारी करण्यात आलेल्या अजामीनपात्र अटक वॉरंटला इस्लामाबाद उच्च न्यायालयाने मंगळवारी १३ मार्चपर्यंत स्थगिती दिली. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आमेर फारूक यांनी आधी राखून ठेवलेला निकाल जाहीर करून, इम्रान खान यांना १३ मार्च रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. इम्रान यांच्या वकिलाने या प्रकरणात न्यायालयात हजर राहण्यासाठी चार आठवडय़ांची मुदत देण्याची विनंती केली, पण ती फेटाळण्यात आली. इम्रान खान यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या काळात मिळालेल्या महागडय़ा मनगटी घडय़ाळांसह काही भेटवस्तू ‘तोशाखाना’ या सरकारी भेटवस्तू संग्रहालयाकडून सवलतीत खरेदी करून, त्यांची नफ्यासाठी विक्री केल्याचा आरोप आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrest warrant against imran khan adjourned till march 13 ysh