श्रीनगरमधील लाल चौकात शनिवारी दुपारी दहशतवाद्यांकडून ग्रेनेडच्या सहाय्याने हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. यामध्ये चार नागरिक जखमी झाले असून, जखमींमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानाचाही समावेश आहे. चौकातील पॅलेडिअम गल्लीच्या परिसरात ही घटना घडली. भारतीय लष्कराच्या तळाला लक्ष्य करण्याच्या उद्देशाने अतिरेक्यांनी हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना एसएमएचएस रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, कोणाचीही प्रकृती गंभीर नाही. परिसरातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर, गुप्तचर विभागाचे अधिकारी तपास करीत आहेत.
दोन दिवसांपूर्वीच सीमारेषेवरील अर्निया भागात दहशतवाद्यांनी मोठ्या शस्त्रसाठ्यासह हल्ला चढवला होता. त्यानंतर आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी भारतातील दहशतवादी कारवायांमागे पाकिस्तानातील काही शक्तींचा हात असल्याचेही सांगितले होते. तसेच भारतीय उपखंडातील वाढत्या इस्लामिक दहशतवादाबद्दलही चिंता व्यक्त केली होती.
संग्रहित लेख, दिनांक 29th Nov 2014 रोजी प्रकाशित
श्रीनगरमध्ये लाल चौकात स्फोट; चार जखमी
श्रीनगरमधील लाल चौकात शनिवारी दुपारी दहशतवाद्यांकडून ग्रेनेडच्या सहाय्याने हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे.

First published on: 29-11-2014 at 03:31 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: At least seven persons injured in a grenade blast at lal chowk in srinagar