scorecardresearch

राजनाथ सिंह

राजनाथ सिंह (Rajnath Singh) भाजपाचे (BJP) वरिष्ठ नेते असून सध्या ते संरक्षणमंत्री (Defence Minister)आहेत. त्यांच्या राजकीय जीनवाची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून झाली. ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षदेखील राहिलेले आहेत.

१९८८ मध्ये ते उत्तरप्रदेश विधान परिषदेवर निवडून आले होते. १९९१ मध्ये उत्तर प्रदेशचे शिक्षणमंत्री झाले. मार्च १९९७ मध्ये ते भाजप उत्तरप्रदेशचे प्रदेशाध्यक्ष झाले. ऑक्टोबर २००० साली ते उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले होते. १९९९ साली अटल बिहारी वाजपेयी मंत्रिमंडळामध्ये त्यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रिपदाची जबाबदारी पार पडली.

२००३ साली राजनाथ सिंह अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री झाले. तर पुढे २०१४ मध्ये नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात ते केंद्रीय गृहमंत्री झाले आणि २०१९ सालापासून ते देशाच्या संरक्षण मंत्रिपदावर आहेत.
Read More

राजनाथ सिंह News

Rajnath Singh Jammu Kashmir
देशात लवकरच सैन्यदलांची संयुक्त कमांड; संरक्षणमंत्र्यांची घोषणा

देशाच्या तिन्ही सैन्यदलांत उत्तम समन्वय राखण्यासाठी लष्कर, हवाई दल आणि नौदल यांची ‘जॉईन्ट थिएटर कमांड’ स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने…

Narayan Rane Rajnath Singh Uddhav Thackeray
राजनाथ सिंह ‘अस्सलाम वालेकुम’ म्हटल्याने उद्धव ठाकरे संतापल्याची चर्चा; नारायण राणे म्हणाले…

नारायण राणे यांनी मंगळवारी (१२ जुलै) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे राजनाथ सिंग यांच्यावर…

presidential election bjp
राष्ट्रपती निवडणुकीत मतांच्या जुळवाजुळवीसाठी राजनाथ सिंह यांच्या सोबतीला तावडे

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून घसघशीत फरकाने विजय मिळवण्यासाठी एक व्यवस्थापन समितीच स्थापन केली आहे.

‘भारताला रक्तबंबाळ करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न’; चोख प्रत्युत्तर देण्याचा राजनाथ सिंह यांचा इशारा

जम्मू-काश्मीरमधील शांततेचा भंग करण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून वारंवार केले जात आहेत.

Agneepath Scheme Protest in bihar
Agneepath Scheme Protest: मोदी सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात बिहारमध्ये आंदोलन; विद्यार्थ्यांनी ट्रेनच्या डब्याला लावली आग; रस्ते वाहतूकही अडवली

Agneepath Recruitment Scheme: संतप्त विद्यार्थ्यांनी भभुआ रेल्वे स्थानकावर इंटरसिटी एक्र्स्प्रेस ट्रेनवर दगडफेक केली आणि एका डब्याला आग लागली

Sharad Pawar Rajnath
Presidential Election: राजनाथ सिंह यांचा शरद पवारांना फोन; ममता बॅनर्जी, खरगेंशीही भाजपाच्यावतीने केली चर्चा

भाजपाकडून राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भातील उमेदवाराची निवड आणि पूर्वनियोजनाची जबाबदारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे सोपवण्यात आलीय.

कोणी आम्हाला छेडले, तर सोडणार नाही!; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा

भारत पूर्णपणे सुरक्षित आहे. जगातील कोणतीच ताकद भारताकडे डोळे वर करून पाहू शकत नाही.

Rajnath Singh Pune
“कोट्याधीश घरातील सुशिक्षित मुलगा लादेन बनतो, तर पेपर टाकणारे…”, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं पुण्यात वक्तव्य

“कोट्याधीश घरात जन्माला आलेला एखादा लादेन बनतो, तर लहानपणी जगण्यासाठी पेपर टाकणारा एक मुलगा पुढे जाऊन ए. पी. जे. अब्दुल…

udaigiri warship launch
विश्लेषण : भारतीय नौदलात आणखी दोन युद्धनौका… काय आहेत उदयगिरी आणि सुरतची वैशिष्ट्ये?

मंगळवारी जलावतरण करण्यात आलेल्या उदयगिरी या स्टेल्थ फ्रिगेट तर सुरत या स्टेल्थ विनाशिकेची निर्मिती या अद्ययावत पद्धतीने करण्यात आली आहे.

नौदलाच्या P8I गस्ती विमानातून राजनाथ सिंहाचा प्रवास, पाणबुडीविरोधी क्षमतांचे घेतलं प्रात्यक्षिक

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या मुंबई दौऱ्यात भारतीय नौदलाच्या P8I विमानातून उड्डाण केलं.

मुंबईत नौदलाच्या दोन युद्धनौका ‘सूरत’ आणि ‘उदयगिरी’चे १७ मे ला जलावतरण

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते माझगाव गोदीमध्ये पहिल्यांदाच दोन युद्धनौकांचे जलावतरण होणार आहे

Indian Pakistan Missile
पाकमध्ये भारतीय क्षेपणास्त्र पडल्यासंदर्भातील निवेदनात संरक्षणमंत्री म्हणाले, “दिलासादायक बाब अशी की…”

९ मार्च रोजी भारतीय क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत १२४ किलोमीटर आतमध्ये कोसळलं, यासंदर्भात संरक्षण मंत्र्यांनी सादर केलं निवेदन

Defense Minister Rajnath Singh
“…तर याची किंमत संपूर्ण जगाला चुकवावी लागेल”; रशिया-युक्रेन युद्धावर राजनाथ सिंह यांचा इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा वाढली आहे, असेही राजनाथ सिंह म्हणाले.

UP Election : भाजपाचं सरकार आल्यास होळी आणि दिवाळीला मोफत गॅस सिलिंडर, विद्यार्थीनींना स्कूटी, राजनाथ सिंह यांची घोषणा

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार करणाऱ्या केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास होळी आणि दिवाळीला…

“सागरी सीमारेषांचे नियम न पाळणारे देश बेजबाबदार”, राजनाथ सिंह यांची चीनवर टीका

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत मुंबईत आयएनएस विशाखापट्टनम युद्धनौका नौदल सेवेत दाखल झाली.

Ordinance Factory Board
संरक्षण दलाचे Ordinance Factory Board विसर्जित, ७ कंपन्यात केले रुपांतर

कंपन्यांपुढे उत्पादन क्षमता, गुणवत्ता वाढवण्याचे लक्ष्य. संरक्षण सिद्धतेत स्वावलंब होण्यासाठी पावले उचलण्याचे कंपन्यांना पंतप्रधानांनी केले आवाहन

Sela Tunnel
तवांगला जोडणाऱ्या बोगद्याच्या उत्खननाचे काम पुर्ण, जून २०२२ पासून सेला बोगदा वाहतुकीसाठी खुला होणार

लष्करी दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ‘तवांग’कडे जाणाऱ्या ‘सेला पास’च्या ठिकाणी बांधले जात आहे बोगदे, यामुळे तवांगशी हिवाळ्यातही संपर्क ठेवणे शक्य होणार

ranjit savarkar on mahatma gandhi father of nation
“मला वाटत नाही की गांधीजी देशाचे राष्ट्रपिता आहेत”, वीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी मांडली भूमिका

महात्मा गांधींऐवजी स्वातंत्र्यवीर सावरकरांना देशाचे राष्ट्रपिता करण्याबाबत ओवैसींनी केलेल्या वक्तव्यावर रणजीत सावरकर यांनी भूमिका मांडली आहे.

veer savarkar mercy petition mahatma gandhi
वीर सावरकरांची दया याचिका आणि गांधीजींचा सल्ला, नेमका काय आहे घटनाक्रम? जाणून घ्या सविस्तर

राजनाथ सिंह यांनी केलेल्या विधानामुळे सावरकरांनी दाखल केलेल्या याचिका आणि महात्मा गांधीजींचा सल्ला यावरून चर्चा सुरू झाली आहे.

Mahatma Gandhi veer savarkar book launch mercy plea british rajnath singh mohan bhagwat
महात्मा गांधींच्या सांगण्यावरून सावरकरांनी दाखल केली होती दया याचिका : राजनाथ सिंह

स्वातंत्र्य संग्रामातील सावरकरांच्या योगदानाला काही लोकांनी बदनाम केले आणि ते आता सहन केले जाणार नाही, असेही राजनाथ सिंह यांनी म्हटले…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

राजनाथ सिंह Photos

PM Modi Holds NITI Aayog Meeting with CMs
12 Photos
Photos : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली नीति आयोगाच्या बैठकीचे आयोजन; महाराष्ट्रासह कोणकोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते उपस्थित, घ्या जाणून

View Photos
Rajnath Singh Jammu Kashmir
12 Photos
Photos: हजारो वार करून भारताला रक्तबंबाळ करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; राजनाथ सिंह यांचा चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा

जम्मू-काश्मीरमधील शांततेचा भंग करण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून वारंवार केले जात आहेत.

View Photos