Atishi दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांची एकमुखाने निवड झाली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा रंगली होती. यामध्ये आता आतिशी यांचं नाव निश्चित झालं आहे. आतिशी ( Atishi ) यांच्या नावाची घोषणा होताच मोठा जल्लोष झाला. अरविंद केजरीवाल हे आज उपराज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करतील. त्यानंतर आतिशी ( Atishi ) या दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आतिशी यांचं नाव चर्चेत होतंच

मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आतिशी ( Atishi ) यांचं नाव सुरुवातीपासूनच आघाडीवर होतं. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या विश्वासू नेत्या अशी आतिशी मार्लेना यांची ओळख आहे. महिला असणं आणि मंत्री असणं या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात ज्या महिला मंत्र्यांकडे सर्वाधिक खाती आहेत त्यापैकी आतिशी या एक आहेत. आम आदमी पक्षाच्या स्थापनेनंतर विधानसभा निवडणुकीसाठीचा आपचा जाहीरनामा आतिशी यांनी तयार केला होता.

आतिशी यांच्याकडे कुठली खाती सध्याच्या घडीला आहेत?

महिला व बालविकास, शिक्षण, पर्यटन, कला, संस्कृती व भाषा, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वीज या विभागांचा समावेश आहे. महिला मतांची बँक आकर्षित करण्यासाठी आतिशी ( Atishi ) यांच्या नावाचा पक्षाने विचार केला असावा. याशिवाय विरोधकांना महिला मुख्यमंत्र्यावर टीका करणं अडचणीचं ठरणार आहे त्यामुळेही हा निर्णय झाला असावा अशी चर्चा आहे.

हे पण वाचा- दिल्लीचा फैसला झाला, अरविंद केजरीवाल यांच्यानंतर आतिशी यांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची सूत्रं!

आतिशी कोण आहेत?

आतिशी मार्लेना या दिल्लीच्या कालकाजी मतदारसंघातून आमदार आहेत.

अरविंद केजरीवाल सरकारमध्ये त्यांच्याकडे सर्वाधिक खात्यांची जबाबदारी आहे.

माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे.

आतिशी दिल्ली सरकारमधील उच्चशिक्षित मंत्र्यांपैकी एक आहेत.

आतिशी यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून इतिहासाची मास्टर्स पदवी घेतली आहे.

२०१९ पासून आतिशी सक्रिय राजकारणात

आतिशी ( Atishi ) यांचा जन्म दिल्लीतील एका उच्चशिक्षित कुटुंबात झाला. त्यांचं कॉलेजपर्यंतचे शिक्षण दिल्लीतूनच झालं आहे पुढे त्या उच्च शिक्षणासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात गेल्या. २०१२ मध्ये आम आदमी पक्षाची स्थापन झाली, आतिशी या २०१९ मध्ये सक्रिय राजकारणात आल्या. त्यावेळी पक्षाने आतिशी यांना पूर्व दिल्लीतून भाजपचे उमेदवार गौतम गंभीर यांच्या विरोधात उमेदवारी दिली होती. यात आतिशी यांचा या निवडणुकीत चार लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला, त्या तिसऱ्या क्रमांकावर होत्या. मात्र, पुढच्या वर्षी कालकाजी विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आणि त्या विजयी झाल्या. तीन वर्षांनंतर मनीष सिसोदिया यांच्या राजीनाम्यानंतर त्या दिल्ली सरकारमध्ये मंत्री झाल्या. २०१९ ते २०२४ अवघ्या पाच वर्षांत त्यांनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली आहे ही बाब महत्त्वाची आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atishi will take oath as new cm of delhi who is she what is her political journey scj