भारतातील निवडणूक कव्हर करण्याची परवानगी नाकारून ऑस्ट्रेलिअन पत्रकार अवनी डायसला भारत सोडण्यास भाग पाडले असल्याचा आरोप अवनीने केला आहे. मात्र हा दावा चुकीचा, दिशाभूल करणारा आणि खोडकर आहे, असे अधिकृत सूत्रांनी मंगळवारी सांगितले. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या दक्षिण आशिया प्रतिनिधी असलेल्या अवनी डायसने २० एप्रिल रोजी भारत सोडला. डायसने आरोप केला होता की तिला सरकारकडून नियमित व्हिसाची मुदतवाढ नाकारली जाईल असे सांगण्यात आले होते. तिला परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने फोनवर या निर्णयाची माहिती दिली होती.तर, तिने व्हिसा नियमांचं उल्लंघन केल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितल. परंतु, तिच्या विनंतीनुसार तिला आश्वासन देण्यात आले की सार्वत्रिक निवडणुकांच्या कव्हरेजसाठी तिचा व्हिसा वाढविला जाण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australian journalists not allowed to cover polls claim misleadin sources sgk
First published on: 24-04-2024 at 09:15 IST