हिमाचल प्रदेश गेल्या ५० वर्षांतील सर्वात भीषण नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत आहे. विक्रमी पावसानंतर झालेल्या भूस्खलनात गेल्या ३-४ दिवसांत ७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे १० हजार कोटी रुपयांची मालमत्ता उद्ध्वस्त झाली आहे. मदत आणि बचाव कार्यादरम्यान मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पुराच्या पाण्यात पत्त्याप्रमाणे घरे कोसळल्याबद्दल त्यांनी बिहारी मजूर आणि गवंडी यांना जबाबदार धरले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री सिखू म्हणाले की, बांधकामासाठी इतर राज्यांतून लोक येतात आणि शास्त्रीय पद्धती न वापरता मजले बांधले जात आहेत. स्थलांतरित वास्तुविशारद (गवंडी) येतात, ज्यांना मी बिहारी वास्तुविशारद म्हणतो. ते आले आणि त्यांनी मजल्यावर मजले चढवले. आमच्या इथे स्थानिक गवंडी नसल्याचंही ते म्हणालेत.

हिमाचल प्रदेशातील शिमल्यात यंदा पावसाळ्यात निसर्गाने कहर केला आहे. हिवाळ्यात पर्यटकांची गर्दी असलेल्या शिमल्यात अतिवृष्टीमुळे भूस्खलनाच्या अनेक घटना घडल्या आहेत. समरहिलमध्ये शिवालयावर डोंगर खचला आहे. तर कृष्णानगरमध्ये अनेक घरे अक्षरशः मातीत गाडली गेली आहेत. शिमला हे एक जुने शहर असून, योग्य ड्रेनेजची व्यवस्था आहे. सरकारी इमारती कोणत्याही धोक्याशिवाय उभ्या आहेत. जी घरे पडली आहेत ती अभियांत्रिकी मानकांनुसार बांधलेली नाहीत, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हेही वाचाः जय श्रीरामचा नारा दिल्याने अल्पवयीन मुलाला शिक्षकाने केली मारहाण, राजधानी दिल्लीतली घटना

मुख्यमंत्री म्हणाले, शास्त्रोक्त पद्धती न वापरता लोक घरं बांधत सुटली आहेत. नुकत्याच बांधलेल्या इमारतींमधील ड्रेनेज व्यवस्था अत्यंत खराब आहे. ड्रेनेजचं पाणी जाण्याची व्यवस्था केलेली नसून ते कमकुवत बनवणार्‍या भिंतींमध्येच घुसत आहे. शिमला दीड शतक जुना आहे आणि उत्तम ड्रेनेज सिस्टीम आहे. आता नाल्यांमध्येच इमारती आणि घरं उभारण्यात आली आहेत.

हेही वाचाः अमेरिकेतील विवाह व्यवस्था धोक्यात? सर्वाधिक घटस्फोट कशामुळे होतात माहितीये?

जी घरे कोसळत आहेत, ती अभियांत्रिकीच्या मापदंडानुसार बांधलेली नाहीत. ‘आमचे सचिवालय ९ मजली आहे. हिमाचल विद्यापीठ, समरहिलमधील अॅडव्हान्स स्टडीची इमारत ८ मजली आहे. या वास्तू बांधल्या गेल्या तेव्हा तंत्रज्ञान नव्हते. या इमारतींना धोका असल्याचे आपण कधी ऐकले नाही, असंही त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे या विधानावरून आता मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी यूटर्न घेतला आहे. “मी असे काही बोललो नाही. बिहारचे लोकही इथे अडकले होते. मी त्यांना हेलिकॉप्टरने बाहेर काढले. बिहारमधील सुमारे २०० लोक अजूनही येथे अडकले आहेत. ते आमच्या भावांसारखे आहेत. हा आमच्या स्ट्रक्चरल इंजिनीअरिंगचा दोष आहे. ते फक्त मजूर आहेत,” असंही त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihari architects responsible for accidents in himachal pradesh serious accusation of chief minister sukhu vrd