भारतीय जनता पक्षाने(भाजप) लोकसभा निवडणूक प्रचारासाठीचे पक्षाचे गाणे सादर करण्यात आले आहे. ‘सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा’ असे या गाण्याचे शिर्षक असून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील काही तुकडे या गाण्यामध्ये घेण्यात आले आहेत.
भाजप नेते अरुण जेटली यांनी भाजपच्या मुख्यालयात हे प्रचारगीत माध्यमांसमोर सादर केले. या गाण्याच्या माध्यमातून मोदींच्या संकल्पनेतील भारताचे विकास चित्र उभे करण्यात आले असल्याचे अरुण जेटली यांनी यावेळी स्पष्ट केले.
या व्हिडिओच्या माध्यमातून देशातील बेरोजगारी, गरिबी, महिलांची सुरक्षा आणि इतर सामाजिक प्रश्नांना भाजपने हाताळण्याचा प्रयत्न केला आहे. गाण्यात खुद्द नरेंद्र मोदींचाही आवाज आहे, तर मूळ गाणे प्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग यांनी गायले आहे. तसेच हे प्रचारगीत प्रसुन जोशी यांनी लिहिले असून त्याला संगीत आदेश श्रीवास्तव यांनी दिले आहे