राज्यात औद्यागिकीकरणाचा अभाव असल्याची टीका भाजपने मंगळवारी पश्चिम बंगालमधील सत्तारूढ तृणमूल काँग्रेसवर केली. राज्यात कायद्याचे राज्यच अस्तित्वात नसल्याने येथे कोणीही सुरक्षित नाही, असेही भाजपने म्हटले आहे.
बंगालमध्ये एकही उद्योग आलेला नाही, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सिंगुरच्या शेतकऱ्यांना जमिनी देण्याचे दिलेले आश्वासन पाळलेले नाही, सिंगूर भूचळवळीमुळेच बॅनर्जी यांना २०११ ची निवडणूक जिंकता आली होती, असे भाजपचे राष्ट्रीय सचिव राहु सिन्हा म्हणाले.
पश्चिम बंगालमधील सर्वसामान्य जनता कायद्याचे राज्य नसल्यान सुरक्षित नाही, असे कैलास विजयवर्गीय म्हणाले. राज्यात मा, माटी,मानूष सुरक्षित नाही, अशी टीकाही त्यांनी केली.