Miss World 2025 : तेलंगणा येथे होणाऱ्या मिस वर्ल्ड २०२५ या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आलेल्या मिस इंग्लंड २०२४ मिल्ला मॅगीने (Milla Magee) अचानक स्पर्धा सोडल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मिस इंग्लंडचा प्रतिष्ठित किताब जिंकणारी मिल्ला मॅगी हिने अचानक मिस वर्ल्ड २०२५ ही स्पर्धा सोडल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसेच मिल्ला मॅगी हिने ही स्पर्धा अचानक सोडण्याच्या पाठिमागचं कारण ऐकून अनेकांना धक्का बसला आहे.

मिस इंग्लंड मिल्ला मॅगीने मिस वर्ल्ड स्पर्धेतून माघार घेत ती भारतातून यूकेला परतली आहे. मात्र, पुन्हा जात असताना तिने आयोजकांवर गंभीर आरोप केले आहेत. मिल्ला मॅगी म्हटलं की, “मी तिथे काही बदल घडवून आणण्यासाठी गेले होते. मात्र, तेथे आम्हाला प्रदर्शन करणाऱ्या माकडांसारखं बसून राहावं लागलं. ते भूतकाळात अडकलेले आहेत”, असे आरोप मिल्ला मॅगीने केले आहेत. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

भारतातील मिस वर्ल्ड २०२५ या स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर मिल्ला मॅगीने आयोजकांवर शोषणाचे आरोप केले आहेत. तसेच तिने असंही म्हटलं की, तिला हे वेश्या असल्यासारखं वाटलं. ही या स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर तिने प्रथम वैयक्तिक कारणांना दोष दिला. तसेच नंतर खुलासा करत ती या स्पर्धेतून बाहेर पडणारी पहिली मिस इंग्लंड असल्याचंही स्पष्ट केलं. दरम्यान, २०२४ ची मिस इंग्लंड मिल्ला मॅगी यामुळे आता पुन्हा एकदा सर्वत्र चर्चेत आली आहे.

भारत सोडून मायदेशी परतली

हैदराबादमध्ये मिस वर्ल्ड स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. तसेच युनायटेड किंग्डमचं प्रतिनिधित्व मिल्ला मॅगीला मिळालं होतं. पण तिने आता वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धा सोडण्याचा आणि आपल्या मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. तसेच मिस वर्ल्ड स्पर्धेच्या इतिहासात मिस इंग्लंडचा किताब जिंकणाऱ्या महिलेने स्पर्धा सोडण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं सांगितलं जातं.

श्रीमंत पुरुषांसमोर परेड करावी लागल्याचा आरोप

स्पर्धेत भाग घेत असताना तिला कसं वागवलं गेलं? याबाबत तिने गंभीर आरोप केले. मला वेश्या असल्यासारखं वाटलं. कारण श्रीमंत पुरुष प्रायोजकांसमोर परेड करावी लागल्याचा आरोप तिने केला आहे. तसेच आपली प्रतिष्ठा वाचावी म्हणून आपण स्पर्धा सोडण्याचा निर्णय घेतल्याचंही तिने स्पष्ट केलं असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.