दिल्लीच्या राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये चार कॅबिनेट मंत्री, १४ राज्यमंत्री आणि स्वतंत्र प्रभार असणाऱ्या तीन राज्यमंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.  मंत्रिमंडळात सामील करून घेण्यात आलेल्या खासदारांमध्ये प्रामुख्याने मनोहर पर्रिकर, जे.पी. नड्डा, राजीवप्रताप रूडी, हंसराज अहिर आणि शिवसेनेचे खासदार सुरेश प्रभू यांचा समावेश आहे. जगतप्रकाश नड्डा, चौधरी वीरेंद्रसिंह यांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाची, तर बंडारू दत्तात्रेय, राजीव प्रताप रुडी, डॉ. महेश शर्मा यांनी राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) पदाची शपथ घेतली. तसेच, मुख्तार अब्बास नक्वी, हरीभाई पार्थीभाई चौधरी, प्रा. संवरलाल जट, गिरीराज सिंह, , रामशंकर कटेरिया, वाय.एस. चौधरी, राजवर्धनसिंह राठोड, बाबुल सुप्रियो यांचा राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेली नावे पुढीलप्रमाणे:

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कॅबिनेट मंत्री
मनोहर पर्रिकर
सुरेश प्रभू
जे पी नड्डा
बिरेंद्र सिंह

राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
बंडारु दत्तात्रय
राजीव प्रताप रुडी
डॉ. महेश शर्मा

राज्यमंत्री
मुख्तार अब्बास नक्वी
रामकृपाल यादव
हरिभाई चौधरी
संवरलाल जाट
मोहनभाई कुंदरिया
गिरीराज सिंह
हंसराज अहिर
रामशंकर कथेरिया
वाय एस चौधरी
जयंत सिन्हा
राज्यवर्धन राठोड
बाबूल सुप्रियो
साध्वी निरंजन ज्योती
विजय सांपला

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cabinet expansion in modi government