‘अमेरिकेनचे कृत्य प्रक्षोभक’
दक्षिण चिनी सागरात गेल्या दोन दिवसात अमेरिकेने युद्धनौका आणून ठेवली आहे, तसेच या वादग्रस्त भागात क्षेपणास्त्रसज्ज विनाशिकेच्या मदतीने गस्तही घालण्यात आली. या घडामोडींबाबत चीनचे नौदल प्रमुख वू शेंगाली यांनी चिंता व्यक्त केली आहे.
अमेरिकेचे नौदल प्रमुख अ‍ॅडमिल जॉन रिचर्डसन यांच्याशी वू यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने चर्चा केली. अमेरिकेने केलेले कृत्य प्रक्षोभक असून त्यामुळे चीनची सुरक्षा व सार्वभौमत्वाला तसेच शांतता-स्थिरतेस धोका निर्माण झाला आहे.
अमेरिकेची क्षेपणास्त्रे असलेली यूएसएस लॅसेन ही विनाशिका झुबी रीफ येथे परवानगीशिवाय आली हे आम्हाला पटलेले नाही, असे वू यांनी सांगितले. अमेरिकेच्या विनाशिकेला चीनने अनेकदा इशारा दिला होता तरी त्याकडे दुर्लक्ष करण्यात आली ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दक्षिण चीन सागर हा आमचाच सार्वभौम भाग आहे, असा चीनचा दावा असून त्याला व्हिएतनाम, फिलिपिन्स, मलेशिया, ब्रुनेई व तैवान यांचाही विरोध आहे. या पाचही देशांना चीनविरोधात अमेरिकेने पाठिंबा दिला आहे. नानशा बेटे व आजूबाजूचा सागरी प्रदेश आमचाच आहे असे चीनचे म्हणणे आहे.
चीनने तेथे बेट बांधण्याचे काम चालू ठेवले आहे. अमेरिकेने
त्यांचा प्रस्ताव इतर देशांवर लादू
नये असा इशाराही चीनने दिला आहे.