वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चिनी हॅकर्सकडून अमेरिकेचा वित्त विभाग हॅक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यात हॅकरनी तृतीय पक्ष सॉफ्टवेअर प्रदात्याशी संगनमत करून वित्त विभागाची अनेक वर्कस्टेशन आणि अवर्गीकृत दस्तऐवजांमध्ये प्रवेश केल्याचे सोमवारी विभागाने म्हटले आहे. मात्र हॅकरनी नेमकी कोणती कागदपत्रे अथवा माहिती मिळविली याबाबतचा तपशील विभागाने दिलेला नाही.

सायबर सुरक्षेसंदर्भातील मोठी घटना असून याची चौकशी केली जात असल्याचे विभागाने म्हटले आहे. वित्त विभागाच्या सर्व प्रणालींवरील धमक्या गांभीर्याने घेतल्या जात असून गेल्या चार वर्षांत विभागाने सायबर सुरक्षेकडे विशेष लक्ष दिल्याचे विभागाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. अशा हॅकरपासून वित्तीय प्रणालीचे संरक्षण करण्यासाठी खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारांसोबत मिळून काम करणार असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा : ‘उठावा’चा जाहीरनामा, जुलैमधील घडामोडींबाबत बांगलादेशच्या हंगामी सरकारचा निर्णय

अमेरिकन अधिकारी ‘सॉल्ट टायफून’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिनी सायबर हेरगिरी मोहिमेचा सामना करत असताना ही घटना घडली आहे. ज्यातून अमेरिकन लोकांच्या खासगी मजकूर आणि फोन संभाषणांत प्रवेश केला होता. या सायबर हेरगिरीमुळे प्रभावित झालेल्या दूरसंचार कंपन्यांची संख्या ९ वर पोहोचली आहे. ८ डिसेंबरला या हॅकिंगची माहिती मिळाल्याचे वित्त विभागाने म्हटले आहे. चीनने आरोप फेटाळून लावले

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी हॅकिंगचे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. तसेच चीन सर्व प्रकारच्या हॅकिंगला सातत्याने विरोध करत आला आहे. हे आरोप राजकीय हेतूने करण्यात आले आहेत असे त्यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chinese hackers attack on us treasury department and get access to workstations and documents css