पंजाबच्या तरनतारन जिल्ह्यातील ठाकरपुरा गावात काही अज्ञात तरुणांनी गावातील एका कॅथेलिक चर्चची तोडफोड केली आहे. आरोपींनी चर्चच्या सुरक्षा रक्षकाला बंदुकीचा धाक दाखवून ओलीस ठेवलं आणि चर्चच्या आवारातील एका कारला आग लावली आहे. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी चर्चमधील मूर्तींची तोडफोडही केली आहे. हा धक्कादायक प्रकारानंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री काही अज्ञात तरुणांनी चर्चमध्ये घुसून मदर मेरीच्या पुतळ्याची तोडफोड केली. चर्चमध्ये तोडफोड केल्याची सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. संबंधित सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन आरोपी तरुण चर्चची तोडफोड करताना दिसत आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचा- भाजपा नेत्यानं आदिवासी महिलेला शौचालय चाटण्यास भाग पाडलं, आरोपांनतर पक्षाकडून निलंबनाची कारवाई

“आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. काही अज्ञात तरुणांनी चर्चच्या सुरक्षा रक्षकाला बंदुकीचा धाक दाखवून चर्चच्या आवारातील कार पेटवून दिली आहे. तसेच चर्चमधील एका पवित्र पुतळ्याचे शीर काढून नेण्यात आलं आहे. दोषींना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती तरनतारन पोलिसांच्या प्रवक्त्याने दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. धर्मांतराच्या कारणातून ही तोडफोड झाल्याचा प्राथमिक संशय स्थानिकांकडून व्यक्त केला जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Church vandalised and car set on fire security guard hostage at gunpoint in tarn taran panjab rmm