cm eknath shinde replied to ajit pawar criticism on guwahati visit spb 94 | Loksatta

“गुवाहाटीला कोणाचा बळी द्यायला चालले?” म्हणणाऱ्या अजित पवारांना मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “कामाख्या देवी कडक…”

शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यासंदर्भात बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कामाख्या देवीला रेड्याचा बळी दिला जातो, हे आता कोणाचा बळी द्यायला चालले? अशी टीका केली होती.

“गुवाहाटीला कोणाचा बळी द्यायला चालले?” म्हणणाऱ्या अजित पवारांना मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “कामाख्या देवी कडक…”
संग्रहित

शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यासंदर्भात बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कामाख्या देवीला रेड्याचा बळी दिला जातो, हे आता कोणाचा बळी द्यायला चालले? अशी टीका केली होती. अजित पवारांच्या या टीकेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील आमदार गुवाहाटीला कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले आहेत. आसाममध्ये पोहोचताच माध्यमांशी बोलताना त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

“कामाख्या देवी कडक आणि जागृत आहे. त्याची प्रचिती आम्हाला आली आहे. राज्यात सर्व सामान्य जनतेच्या मनातले सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे विरोधकांनी बोलाताना तारतम्य बाळगले पाहिजे. आम्ही श्रद्धेने, भक्तीने इथे आलो आहे. आम्ही चार महिन्यापूर्वी इथे आलो होतो. त्यानंतर इथे येण्याची सर्वांची इच्छा होती. त्यामुळे आम्ही पुन्हा दर्शनाला आलो आहे”, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले.

हेही वाचा – गुणरत्न सदावर्तेंच्या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडचा राडा, घोषणाबाजी करत अंगावर शाईफेक

“आसामध्ये आम्हाला जो प्रतिसाद मिळतो आहे, त्याचा आनंद आहे. आज कामाख्या देवीच्या दर्शनाला पुन्हा येण्याचं भाग्य आम्हाला मिळाले आहे. आम्ही आज कामाख्या देवीचे दर्शन घेऊन परत महाराष्ट्रात जाणार आहोत”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – Video: “राज्य सरकारनं जीभ दिल्लीला…”, महिलांच्या कपड्यांविषयी रामदेव बाबांच्या ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा सवाल!

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावरून बोलताना अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला होता. “ते कामाख्या देवीच्या दर्शनाला चालले आहेत. काही ठिकाणी आपण बकरं कापतो, काही ठिकाणी कोंबडी कापतो. तसं तिथं रेडा कापला जातो म्हणतात. रेड्याचा बळी देतात. आता हे कुणाचा बळी द्यायला चालले आहेत ते माहिती नाही. पण जर दर्शनाच्या कामाला चालले असतील तर आपण एकमेकांना शुभेच्छाच देतो”, असं अजित पवार म्हणाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 14:59 IST
Next Story
डेटिंग अॅपवरील बॉयफ्रेंडला भेटायला 5 हजार किमीचा प्रवास; अवयवांच्या विक्रीसाठी त्यानं केली तिची हत्या