scorecardresearch

अजित पवार

 


अजित पवार हे महाराष्ट्र राज्यातील राजकारणी आहेत. त्यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी महाराष्ट्रातील बारामती येथे झाला. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी आतापर्यंत तीन वेळा महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. ते जुलै २०२३ पासून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी यापूर्वी २०१० ते २०१४ आणि २०१९ ते २०२१ असे दोन वेळा महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्रिपद सांभाळलं आहे. अजित पवार हे एका राजकीय कुटुंबाचे सदस्य आहेत. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून ते आले आहेत. त्यांचे काका शरद पवार हे देशाच्या राजकारणातील प्रमुख व्यक्ती आहेत. अजित पवार यांनी बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून बॅचलर ऑफ कॉमर्स या पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून व्यवसाय प्रशासन (Business Administration) या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. १९९० मध्ये अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. पुढे १९९१ मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर विधानसभेच्या निवडणूकांमध्ये ते अनेकदा निवडून आले. त्यांनी राज्य सरकारमधील अनेक विभागांमध्ये विविध पदांवर काम केले आहे. जलसंपदा मंत्री आणि ऊर्जा मंत्री म्हणून काम करण्याचा त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे.पवार त्यांच्याकडे असलेल्या प्रशासकीय कौशल्यासाठी प्रसिद्ध आहेत. राज्यामधील वेगवेगळे सिंचन प्रकल्प यशस्वीपणे राबविण्याचे श्रेय त्यांना जाते. पण जलसंपदा मंत्री असताना सिंचन प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप करण्यात आले होते. कामामध्ये अनियमिततेच्या आरोपांसह अन्य वादांमध्येही ते अडकले होते. २०१९ मध्ये अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाशी युती करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या या निर्णयाने सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. पुढे काही दिवसांनी त्यांनी वैयक्तिक कारण देत या पदाचा राजीनामा दिला. महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांनी ते दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून महाराष्ट्रातील प्रमुख राजकिय व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. कार्यक्षम प्रशासक म्हणून त्यांचा लौकिक असला, तरीही कामाप्रमाणे त्यांची राजकीय कारकीर्द ही वाद, भष्ट्राचाराच्या आरोपांसाठी प्रसिद्ध आहे. अजित पवार हे महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख भारतीय राजकारणी आहेत.


Read More
Maharashtra Live News Updates in Marathi
Maharashtra Live News Update : एकनाथ शिंदेंच्या ‘जय गुजरात’च्या घोषणेनंतर संजय राऊत आक्रमक; म्हणाले, “हा माणूस मंत्रिमंडळात कसा राहू शकतो?”

Maharashtra Breaking News LIVE Updates : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.

aditi tatkare ladki bahin yojana
Ladki Bahin Yojana: आदिती तटकरे म्हणतात, ‘लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना कर्ज देण्याचा कोणताही विचार नाही’, मग अजित पवारांच्या घोषणेचं काय झालं?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना छोट्या व्यवसायांसाठी कर्ज मिळू शकेल, अशा आशयाची घोषणा अजित पवारांनी केली होती.

Amit Shah to attend events in Pune today
अमित शहा आज पुण्यात

शहा यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हेही या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

Ladki Bahin Yojana Denefits Discontinued For 2289 Women In Maharashtra
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून २,२८९ महिलांना वगळले; आदिती तटकरेंची विधानसभेत माहिती

Ladki Bahin Yojana Updates: महिला आणि बालविकास विभाग आणि महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा उद्देश राज्यातील पात्र महिलांना…

maharashtra phd scholarship policy ajit pawar statement not possible to provide scholarships to everyone
निवडणुकीसाठी निर्णय घेतला, आता खर्च करण्याची ऐपत नाही – अजित पवार यांची कबुली प्रीमियम स्टोरी

नाराजी नको म्हणून अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यामुळे खर्चाचा आकडा वाढला. आता ते शक्य होणार नाही, अशी कबुली उपमुख्यमंत्री…

baramaati pravin mane joins bjp strategic move in indapur to counter ajit pawar and ncp
इंदापूरमध्ये भाजपचा अजित पवार व हर्षवर्धन पाटलांना शह? प्रीमियम स्टोरी

प्रवीण माने यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील या दोघांनाही शह देण्याची राजकीय खेळी खेळल्याचे स्पष्ट झाले…

Vijay Bhamble joins Ajit Pawar
भांबळे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर आता मित्रपक्षात सत्ता संघर्ष

माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून भांबळे यांच्या राजकारणाची सुरुवात झालेली आहे. तब्बल दोन दशकांपासून दोघांमध्ये राजकीय…

parinay fuke latest marathi news
विधान परिषदेत येऊन चूक केली, निधी मिळत नसल्याने परिणय फुके यांचा घरचा आहेर

मी या सभागृहात येऊन चूक केली, विधानसभा लढवायला हवी होती अशी खंत परिणय फुके यांनी व्यक्त केली.

Ajit Pawar group youth leader commits suicide seven people including Sharad Pawar group leader including his wife face charges
अजित पवार गटाच्या युवक नेत्याची आत्महत्या; पत्नीसह शरद पवार गटाच्या नेत्यासह सात जणांवर गुन्हा

कौटुंबिक कारणांवरून त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे स्थानिक नेते, माजी उपमहापौर पद्माकर ऊर्फ नाना काळे…

ncp ajit pawar faction
धर्मरावबाबांचे मुंबईत शक्तीप्रदर्शन, विविध पक्षातील दीडशेहूनअधिक नेत्यांच्या प्रवेशाने अजित पवार गट…

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माजी मंत्री आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल दीडशेहून अधिक राजकीय पदाधिकाऱ्यांचा प्रवेश…

Shivajirao Naik Ajit Pawar news in marathi
शिराळ्याच्या शिवाजीराव नाईकांचे पक्षांतराचे वर्तुळ पूर्ण 

शिवाजीराव नाईक यांनी दोन वर्षासाठी आ. जयंत पाटील यांच्याशी केलेला घरोबा मोडीत काढून पुन्हा सत्तेच्या मांडवाखाली म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित…

त्रिभाषा सूत्राचा शासन निर्णय रद्द केल्याची माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे (छायाचित्र @OfficeOfDevendra)
हिंदी-मराठी वादातून ठाकरे बंधूंना नवसंजीवनी; महायुतीची कोंडी कशामुळे झाली?

Maharashtra Political News : खरंतर, पहिलीपासून हिंदी भाषा शिकविण्याचे दोन्ही शासन निर्णय शिक्षण विभागाकडून काढण्यात आले होते.

संबंधित बातम्या