आफ्रिकेच्या महिलांना लक्ष्य करून त्यांच्याविरुद्ध वर्णद्वेषी वक्तव्य करणारे दिल्लीचे विधिमंत्री सोमनाथ भारती आणि आपचे कार्यकर्ते यांच्या बचावासाठी दिल्ली पोलिसांच्या उत्तरदायित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल माकपने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना फटकारले आहे. सोमनाथ भारती आणि आपच्या समर्थकांनी दिल्लीच्या दक्षिण भागांतील एका परिसरात आफ्रिकेच्या काही महिलांविरुद्ध शेरेबाजी केली, त्या महिलांच्या हक्कांचे उल्लंघन केले आणि त्यांच्याविरुद्ध वर्णद्वेषी वक्तव्ये केली. एका मंत्र्याला अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यात सहभागी होणे शोभादायक आहे का, असा सवाल माकपच्या पॉलिट ब्युरोने उपस्थित केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jan 2014 रोजी प्रकाशित
दिल्लीतील मंत्र्यांच्या वर्णद्वेषी वक्तव्याला केजरीवालांची फूस?
आफ्रिकेच्या महिलांना लक्ष्य करून त्यांच्याविरुद्ध वर्णद्वेषी वक्तव्य करणारे दिल्लीचे विधिमंत्री सोमनाथ भारती आणि आपचे कार्यकर्ते यांच्या बचावासाठी दिल्ली
First published on: 22-01-2014 at 01:50 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Communist party of india marxist faulted arvind kejriwal for defending somnath bharti