अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे आम आदमी पार्टीचे (AAP) राष्ट्रीय संयोजक आणि केंद्रशासित प्रदेश दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. देशातील वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ (IAC) मोहिमेचे ते सदस्य होते.
२०१२ मध्ये आयएसी मोहिमेद्वारे जनलोकपाल विधेयक आणण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर त्यांनी स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला. केजरीवाल यांनी आयआयटी खरगपूरमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं असून ते व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनियर आहेत. त्यांनी आयकर विभागाचे संयुक्त आयुक्त म्हणूनही काम केलं आहे.
परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून त्यांनी तळागाळातील लोकांसाठी केलेल्या सामाजिक कामासाठी त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. २०१२ मध्ये केजरीवाल पहिल्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले होते. परंतु त्यांच्या पक्षाला सभागृहात पूर्ण बहुमत नसल्याने जनलोकपाल विधेयक पारित करू शकलो नाही, असा दावा करत त्यांनी अवघ्या ४९ दिवसांत राजीनामा दिला. त्यानंतर २०१५ मध्ये आम आदमी पार्टीने दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ६७ जागा जिंकत मोठा विजय संपादन केला. Read More