देशातील पहिला सहकारी दुग्धसंघ म्हणून ओळख असलेल्या गुजरातमधील अमूल दुग्धसंघावर काँग्रसने पुन्हा एकदा आपली सत्ता कायम राखली आहे. निवडणुक लढविण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या ११ जागांपैकी ९ जागा जिंकत काँग्रसने पुन्हा एकदा दुग्धसंघाची एकहाती सत्ता मिळवली आहे. या विजयामुळे काँग्रेसचे रामसिंग परमार सलग चौथ्यांदा अमुल दुग्धसंघाच्या अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात झालेल्या जिल्हा सहकारी बँकांच्या निवडणुकीतदेखील नांदेड वगळता काँग्रेसने आपले सर्व गड कायम राखले होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पिछेहाट झालेल्या काँग्रेसला या लागोपाठच्या यशामुळे चांगलाच दिलासा मिळाला आहे. गुजरात सहकारी दुग्ध विपणन फेडरेशनचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राज्यातील एकूण १७ दुग्धसंघांमध्ये अमूलचा वरचष्मा आहे. विशेष म्हणजे उर्वरित १६ दुग्धसंघांवर भाजपची सत्ता असली तरी अमूलच्या रूपाने असलेले काँग्रसचे संस्थान खालसा करण्यात भाजपला अपयश आले आहे. या निवडणुकीत काँग्रेसप्रणित अमूल विकास पॅनेलला १३ पैकी ९ जागांवर तर भाजपप्रणित पॅनलला अवघ्या एका जागेवर यश मिळाले आहे. तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. तर उर्वरित दोन जागांवर निवडणुकीत लढविण्यात आली नाही. त्यामुळे आता संचालक मंडळापैकी १० जागांवर काँग्रेस आणि एका अपक्षासह उर्वरित तीन जागांवर भाजपची सत्ता राहणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th May 2015 रोजी प्रकाशित
गुजरातमधील अमूल सहकारी दुग्धसंघावर काँग्रेसची सत्ता
देशातील पहिला सहकारी दुग्धसंघ म्हणून ओळख असलेल्या गुजरातमधील अमुल दुग्धसंघावर काँग्रसने

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 13-05-2015 at 03:24 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress retains control over amul dairy in gujarat