करोना व्हायरसमुळे देशातील ३० राज्यांमध्ये लॉकडाउन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद आहे. देशात ही स्थिती ३१ मार्चपर्यंत कायम राहणार आहे. ट्रेन, बस सेवा बंद असल्यामुळे दैनंदिन रोजंदारीवर काम करणाऱ्यांचे हाल होत आहेत.
अनेकांचे वेतन कापले जाण्याची शक्यता आहे. हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होऊ नयेत यासाठी पंतप्रधानांसह अन्य नेत्यांनी कोणाचेही वेतन कापू नका असे आवाहन केल आहे. प्रथमच निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे गरीबांचे हाल होऊ नयेत यासाठी त्यांना काही पैसे, धान्य मोफतमध्ये उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी होत आहे.
तामिळनाडूने आपल्या राज्यातील जनतेसाठी असा निर्णय घेतला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. तामिळनाडूत सर्व रेशन कार्ड धारकांना १ हजार रुपये, मोफत तांदूळ, साखर आणि अन्य जीवनावश्यक वस्तू देणार. लांब रांग टाळण्यासाठी टोकनच्या आधारावर या वस्तू देण्यात येतील. तामिळनाडूचे मुख्यमंत्री के पालानीस्वामी यांनी ही माहिती दिली.