भारतामधील करोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा अधिक घातक ठरल्याचे आकडेवारीवरुन आणि सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवरुन दिसून येत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे करोना रुग्णांना आपला जीव गमावावा लागल्याच्या घटना घडत आहेत. आग्रा येथेही अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी समोर आली. येथील एक महिला आपल्या पतीने घेऊन रिक्षाने एसएन मेडिकल कॉलेजमध्ये पोहचली. पतीला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने या महिलेनेच अनेकदा पतीच्या तोंडात स्वत:च्या तोंडाने हवा फुंकून ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला. मात्र शर्थीचे प्रयत्न करुनही तिला पतीचा जीव वाचवता आला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विकास येथील सेक्टर सातमध्ये राहणाऱ्या ४७ वर्षीय रवि सिंघल यांची तब्बेत अचानक बिघडली. त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. पतीला होणारा त्रास पासून त्यांची पत्नी रेणू ही नातेवाईकांसोबत रवि यांना श्री राम रुग्णालयात घेऊन गेली. मात्र तेथे बेड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आलं. त्यानंतर रेणू यांनी रवि यांना साकेत रुग्णालय आणि केजी नर्सिंग होममध्ये दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र बेड उपलब्ध नसल्याने रवि यांना दाखल करुन घेण्यात आलं नाही, असं अमर उजाला या हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

अनेक रुग्णालयांमध्ये प्रयत्न केल्यानंतर रवि यांची प्रकृती खालावत असल्याने रेणू यांनी रिक्षातून त्यांना एसएन मेडिकल कॉलेजमध्ये आणलं. या प्रवासादरम्यान रवि यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने रेणू त्यांना तोंडानेच श्वास देत होत्या. रुग्णालयामध्ये पोहचल्यानंतर डॉक्टरांनी रवि यांना मृत घोषित केलं. डॉक्टरांचं म्हणणं ऐकून ऱेणू यांचा धीर खचला आणि त्या रडू लागल्या.
अखेर रेणू या ऑटोने आजारी पतीला एसएस मेडिकल कॉलेजमध्ये आणलं. रस्त्यात त्या पुन्हा पुन्हा पतीला स्वत:च्या तोंडाने श्वास देण्याचा प्रयत्न करत होत्या. एसएन मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरांनी रवि यांना तपासून मृत घोषित केलं. रेणू यांना यावर आधी विश्वास बसला नाही. पण त्यानंतर त्यांचे अश्रू थांबण्याचं नाव घेत नव्हते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus agara wife tried to give oxygen to husband via mouth to mouth respiration but husband died scsg