सध्या करोना व्हायरसनं जगभर धुमाकूळ घातलेला असून विविध स्तरांवर सावधगिरी बाळगण्यात येत आहे, याला ब्रिटिश राजघराणंही अपवाद नाही. इंग्लंडमध्येही करोना व्हायरसची लागण झालेल्यांमध्ये वाढ झाली असून, लोकांच्या भेटीगाठी घेताना हात मिळवू नका असा सल्ला देण्यात येत आहे. या सल्ल्याचे पालन ब्रिटिश राजघराण्यातील व्यक्तिही करत आहेत. अन्य लोकांशी कुठल्याही प्रकारचा शारीरिक संबंध येऊ देऊ नका, हा सल्ला रॉयल फॅमिलीचे सदस्य तंतोतंत पाळत आहेत. प्रिन्स चार्ल्स यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये लोकांशी हस्तांदोलन करणं टाळलं व चक्क भारतीय पद्धतीच्या नमस्तेचा अवलंब केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रिन्स चार्ल्स यांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला असून, आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी ही क्लिप शेअर केली आहे व कॅप्शन दिली की, “नमस्ते, आम्ही भारतीयांनी असं अभिवादन करायला खूप आधीच सांगितलं होतं. आता फक्त नीट नमस्ते कसा करायचा याचा एक वर्ग घ्यायला हवा.”
बारा सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये प्रिन्स चार्ल्स कारमधून येताना दिसत आहेत. कारमधून खाली उतरल्यावर ते हात पुढे करतात, आणि लगेच त्यांच्या लक्षात सावधगिरीचे उपाय येतात मग ते नमस्ते करतात. अवघड स्थिती झालेले दोन प्रत्यक्षदर्शी हसताना दिसत आहेत.

https://twitter.com/ProIndic/status/1237960745326759936?s=20

या नंतरही प्रत्येकाशी प्रिन्स चार्ल्स हस्तांदोलन न करता नमस्ते करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे आणि कमेंट्सचाही पूर आला आहे.
ज्या करोना व्हायरसच्या भितीमुळे हे घडलं त्या करोनामुळे जगभरात चार हजारांपेक्षा जास्त लोकांनी प्राण गमावले असून लाखापेक्षा जास्त लोकांना त्याची लागण झाली आहे. जगातल्या ११० पेक्षा जास्त देशांमध्ये हा व्हायरस पसरला असून जागतिक आरोग्य संघटनेने करोनाला पँडेमिक किंवा जागतिक साथ असे घोषित केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus prince charles indian namaste