श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. श्रद्धाचा प्रियकर आफताब अमीन पूनावालाने तिचा गळा आवळून खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी शनिवारी पोलिसांनी आफताबला अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. दरम्यान, आफताब पोलीस तपासांत सहकार्य करत नसल्याचे म्हणत त्याची नार्को टेस्ट करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी दिल्ली सत्र न्यायालयाकडे केली होती. ही मागणी दिल्ली सत्र न्यायालयाकडून मान्य करण्यात आली आहे.

हेही वाचा – Shraddha Murder Case Photos: प्रेयसीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे, कबुली जबाब अन् थेट ‘त्या’ जंगलात आफताबबरोबर पोहोचले पोलीस

आफताबकडून पोलिसांची दिशाभूल

अफताबला अटक केल्यानंतर तो सातत्याने दिल्ली पोलिसांची दिशाभूल करत असून त्याने अद्यापही श्रद्धाचा मोबाईल आणि तिची हत्या करण्यासाठी वापरलेल्या चाकू संदर्भात माहिती देत नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तसेच नार्को चाचणीदरम्यान पोलिसांच्या पथकासोबत मानसोपचारतज्ज्ञही उपस्थित असतील, अशी माहितीही पुढे आली आहे. दरम्यान, नार्को टेस्टचा अहवाल न्यायालयात मान्य नसला, तरी आतापर्यंत हाती लागलेल्या पुराव्याची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी मदत होईल.

हेही वाचा – Photos: फूड ब्लॉगर ते प्रेयसीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करणारा खूनी, कोण आहे आफताब पूनावाला?

नेमकं काय आहे प्रकरण?

आफताब व श्रद्धा यांची कॉलसेंटरमध्ये नोकरीला असताना भेट झाली होती. २०१८पासून ते रिलेशनशिपमध्ये होते. श्रद्धाच्या घरच्यांना आफताबसह असलेले तिचे संबंध मान्य नसल्यामुळे त्यांनी २०१९मध्ये त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला सुरुवात केली होती. २०२२ मध्ये कामानिमित्त आफताब व श्रद्धा दिल्ली येथे राहण्यास गेले होते. तेव्हापासून श्रद्धाच्या घरच्यांशी तिचे संपर्क तुटले होते. दरम्यान, काही दिवसांपासून तिची सोशल मीडियावरीह सक्रिय नसेल्याने श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी ६ ऑक्टोबर रोजी पोलीस स्थानकामध्ये तत्कार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी आफताबला २६ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी बोलवले. त्यावेळी त्याने श्रद्धा २२ मे रोजी घर सोडून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र आफताबने त्यापूर्वीच म्हणजेच १८ मे रोजी श्रद्धाची हत्या केली होती. हे नंतर स्पष्ट झालं. दिल्लीमध्ये राहण्यासाठी आल्यानंतर श्रद्धाने लग्नाचा तगादा लावल्याने आफताबने तिचा खून केला.