दोन दिवसांपूर्वी दिल्लीतल्या मुंगेशपूर येथे ५२.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. हे देशातलं सर्वात उच्चांकी तापमान असल्याच सांगण्यात आलं होतं. मात्र, याबाबत आता हवामान विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. सेन्सरमधील त्रुटीमुळे हे तापमान वाढल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा – उष्माघातामुळे ५४ जणांचा मृत्यू, उत्तर भारत उकाड्याने हैराण; दिल्लीत आज धुळीच्या वादळाची शक्यता

२९ मे रोज मुंगेशपूर हवामान केंद्राने दुपारी २.३० वाजता ५२.९ अंश सेल्सिअस तापमानी नोदं केली होती. या वाढलेल्या तापमानाची नोंद ही सेन्सर किंवा स्थानिक घटकातील त्रुटीमुळे असावी, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. तसेच या तापमानाची अचूकता पडताळण्यासाठी एका समितीची स्थापना देखील करण्यात आली होती.

दरम्यान, या समिती आता यासंदर्भातील अहवाल सादर केला आहे. त्यानुसार २९ मे रोजी झालेल्या तापमानीची नोंद सेन्सरमधील त्रुटीमुळे झाल्याचं स्पष्ट झाले आहे. या त्रुटीमुळे हे तापमान ३ अंशांनी वाढल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे. तसेच २९ मे रोजी दिल्लीतील कोणत्याही हवामान केंद्राने ५० अंशाच्या वर तापमानाची नोंद केली नाही, असं स्पष्टीकरणही या अहवालातून देण्यात आलं आहे. या दरम्यान, सर्वाधिक तापमान हे ४५ ते ४९.१ असं सेल्सिअस राहिल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. महत्त्वाची म्हणजे असा प्रकारची घटना यापुढे होऊ नये. यासाठी योग्य त्या उपाय योजना केल्या असल्याचेही हवामान विभागाने म्हटलं आहे.