हरियाणात झालेल्या हिंसाचारानंतर विश्व हिंदू परिषदेची ब्रिज मंडळ जलाभिषेक यात्रा पुन्हा सुरू करण्याकरता सर्व हिंदू समाजाकडून महापंचायतीचे पलवाल येथे आयोजन केले होते. द्वेषपूर्ण भाषण न करण्याच्या अटीवरून या महापंचायतीला पोलिसांनी परवानगी दिली होती. परंतु, हरियाणा गौरक्षक दलाचे आचार्य आझाद शास्त्री यांनी उपस्थित तरुणांना आवाहन केलं आहे. यावेळी त्यांनी ‘करो या मरो’चाही नारा दिला. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मेवत येथे आपल्याला १०० शस्त्रांची परवानगी मिळायला हवी. शस्त्र म्हणजे फक्त बंदुका नव्हे तर रायफल्सची परवानगी मिळायला हवी. कारण रायफल्सची रेंज दूरवर जाते. सध्या ही करो या मरोची स्थिती निर्माण झाली आहे. हिंदू-मुस्लिमांच्या आधारावर या देशाची फाळणी झाली आहे. गांधींनी सांगितल्यानुसार काही मुस्लिम समाजातील लोक मेवात येथे राहिले”, असं शास्त्री म्हणाले.

हेही वाचा >> ‘विहिंप’च्या यात्रेला २८ ऑगस्टपासून पुन्हा प्रारंभ

तसंच, “पोलिसांकडून लावल्या जाणाऱ्या गुन्ह्यांना न घाबरण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. एफआयआरला तुम्ही घाबरू नका. माझ्याविरोधातही अनेक एफआयआर आहेत. पण तुम्ही घाबरू नका”, असंही ते म्हणाले.

सर्व हिंदू समाजाकडून पलवाल जिल्ह्यातील पोंद्री गावात महापंचायतीचं आयोजन केले होते. यावेळी विश्व हिंदू परिषदेची मिरवणूक पुन्हा सुरू करण्यावर चर्चा झाली. येथे हिंसाचार उफाळल्याने ही मिरवणूक थांबवण्यात आली होती. यावेळी दोन होमगार्ड आणि एका मौलवीसह सहा जणांचा मृत्यू झाला. २८ ऑगस्टपासून ही यात्रा पुन्हा सुरू होणार आहे. यासाठी महापंचायतीमध्ये हिंदू गटांनी काही मागण्या मांडल्या आहेत.

  • नूह चकमकींचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) व्हायला हवा.
  • हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपये आणि सरकारी नोकऱ्या. तसंच, जखमींना ५० लाख रुपये देण्यात यावेत.
  • नुह हिंसाचारातील नुकसानीचे विश्लेषण करण्यासाठी सर्वेक्षण करून त्यानुसार नुकसान भरपाई देण्यात यावी.
  • बेकायदेशीरपणे राज्यात घुसलेल्यांना तत्काळ हद्दपार करण्यात यावे.
  • पोलिसांनी दंगलखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कडक कारवाई करावी.
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do or die situation at mahapanchayat hindu group gives call to pick up arms sgk