Donald Trump had ischemic stroke conspiracy theories allege White House cover-up : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे गेल्या आठवड्यात अचानाक शांत झाले आणि सार्वजिक जिवनातून अचानक गायब झाले, यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आणि लोक त्यांच्या प्रकृतीबद्दल तर्क-विचर्क लावू लागले. इतकेच नाही तर जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्तींपैकी एक असणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा ऑगस्टच्या अखेरीस मृत्यू झाल्याची चर्चा देखील सूरू झाली. जवळपास एक लाखांहून अधिक लोकांनी ‘ट्रम्प इज डेड’ अशा पोस्ट आपल्या एक्सअकाउंटवरून केल्या.

या संपूर्ण प्रकारानंतर अमेरिकेत मोठी खळबळ उडाली. यादरम्यान ट्रम्प यांचे नातवंडांबरोबर गोल्फ खेळतानाचे फोटो देखील समोर आले, मात्र तरीही या चर्चांना पूर्णविराम मिळू शकला नाही, उलट त्यानंतर समोर आलेल्या राष्ट्राध्यक्षांच्या फोटोंमुळे त्यांच्या प्रकृतीविषयीच्या शंका अधिकच वाढवल्याचे दिसून आले. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी हे सर्व दावे निराधार असल्याचे सांगत फेटाळून लावले. “माझ्या आयुष्यात इतके चांगले कधीच वाटले नाही,” अशी पोस्ट त्यांनी सोमवारी ट्रुथ सोशलवर केली.

ट्रम्प यांनी स्पष्टीकरण देऊनही आफवा मात्र थांबल्या नाहीत. ट्रम्प यांच्या पोस्टनंतरही वेगवेगळ्या गोष्टी पसरतच राहिल्या. काही जणांना व्हायरल होत असलेल्या गोल्फ खेळतानाच्या फोटोसाठी व्हाईट हाऊसने ट्रम्प यांचा बॉडी डबल उभा केला होता अशी पक्की खात्री होती. ट्रम्प यांनी भारताचा दौरा रद्द केल्याने आणि पत्रकारांना राष्ट्राध्यक्षांच्या जवळ न येऊ देण्यासाठी लावण्यात आलेल्या नियमांमुळे नक्कीच ट्रम्प यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करून टाकले. यामध्ये सर्वात प्रसिद्ध दोन अफवा ठरल्या त्याम्हणजे ischemic stroke किंवा हृदयविकाराचा झटका. तर या सगळ्यात ‘बॉडी डबल’ वापरल्याची थिअरी ही तिसऱ्या क्रमांकावर आहे.

माध्यमांवर घातली बंधने

अनेक सोशल वापरकर्त्यांचे ठाम मत होते की डोनाल्ड ट्रम्प यांना गेल्या आठवड्यात स्ट्रोक आला होता, याशीवाय दुसरे काहीही करण नव्हते असे त्यांचे म्हणणे आहे. याशिवाय माध्यमांवर बंधने घालण्याचे दुसरे कोणतेही करणा नाही असा दावा करणाऱ्या अनेक पोस्ट एक्सवर करण्यात आल्या. ट्रम्प यांच्या कोणी जवळ जाऊ नये किंवा त्यांच्याशी बोलू नये किंवा त्यांचे स्पष्ट फोटो घेता येऊ नयेत यासाठीच हे करण्यात आल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

“जर ते गायब झाले नसतील आणि सातपेक्षा अधिक दिवसांपासून त्यांना कोणीही पाहिले नसेल… तर ते अंटार्टिकामध्ये एलियनशी बोलत बसले असू शकतात. ते उत्तर कोरियामध्ये किम जोंग उनबरोबर वेळ घालवत असू शकतात. काहीही असू शकते. ट्रम्प यांच्या मृत्यू वगळूनही अनेक शक्यता आहेत. पण हे काय सुरू आहे? त्यांना स्ट्रोक आला होता. अजून दुसरं काय असू शकतं? त्यांनी पर्सनॅलिटी ट्रान्सप्लांट केली आणि ते आता खूपच लाजरे झाले आहेत?”, अशी पोस्ट एका वापरक्त्याने केली आहे.

ट्रम्प यांना ischemic stroke?

“मला वाटते की, असे अनेक पुरावे समोर येत आहेत ज्यानुसार व्हाईट हाऊस डोनाल्ड ट्रम्प यांना टीआयए स्ट्रोक आल्याचे लपवत आहे. या आठवड्यात त्यांना आणखी गंभीर असे ischemic stroke आल्याची शक्यता आहे,” असे अशी पोस्ट अॅडम कोचरन (Adam Cochran) यांनी केली आहे.

एक्सवर २३३,००० इतके फॉलोअर्स असलेल्या या यूजरने त्याची थेअरी पटवून देण्यासाठी ३१ पोस्ट असलेला एक थ्रेड एक्सवर पोस्ट केला आहे. कोचरन याने त्याच्या बायोमध्ये स्वतः शोध पत्रकार असल्याचे म्हटले आहे. या पोस्टमध्ये या व्यक्तीने दावा सिद्ध करण्यासाठी मार्च २०२४ पासूनच्या हेल्थ अपडेट पोस्ट केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने दावा केला आहे की,

त्याने दावा केला की, ही समस्या टीआयए किंवा ‘मिनी स्ट्रोक्स’पासून सुरू झाली, ज्यामध्ये मेंदूकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहात काही काळासाठी अडथळा येतो आणि स्ट्रोकसारखी लक्षणे दिसतात. तसेच त्याने सध्या व्हायरल होत असलेले फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट केले आहेत ज्यामध्ये त्याने ट्रम्प हे त्यांचा उजवा पाय ओढत चालत असल्याचे दिसत आहे. याबरोबरच त्यांच्या हातावर असलेल्या जखमांचेही अपडेट देण्यात आले आहेत. तसेच Cochran याने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सध्या देण्यात आलेल्या औषधांचा (त्यांच्या वार्षिक वैद्यकीय अहवालात नमूद केलेल्या) दाखला देत ही औषधे स्ट्रोक रोखण्यासाठी दिली जातात असे म्हटले आहे.