Donald Trump warns BRICS Replacing Dollar : अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या त्यांच्या नवनव्या निर्णयांमुळे जगभर चर्चेत आहेत. अशातच आता त्यांनी ब्रिक्स (BRICS) राष्ट्रांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ब्रिक्स राष्ट्रे (ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका) त्यांचं नवं चलन सुरू करण्याच्या प्रयत्नात असल्याच्या बातम्या अलीकडच्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आहेत. मात्र, ट्रम्प यांनी यावरून ब्रिक्स देशांना थेट धमकी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “ब्रिक्स देशांनी एक गोष्ट ध्यानात घ्यावी की ते डॉलरला पर्याय निर्माण करू शकत नाहीत. जर तसा प्रयत्न होत असल्यास अमेरिका ब्रिक्स राष्ट्रांवर १०० टक्के लावू शकते”.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवर यासंबंधीची एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की “ब्रिक्स देश अमेरिकन डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान देऊ पाहतायत आणि गेल्या काही महिन्यांपासून आम्ही केवळ बघ्याच्या भूमिकेत आहोत. मात्र, आता तसं चालणार नाही. अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी ब्रिक्सने नवीन चलन तयार करू नये. तसेच ब्रिक्सच्या प्रभावाखाली असलेल्या राष्ट्रांना माझं सांगणं आहे की त्यांनी या ब्रिक्स चलनाचं समर्थन करू नये. ही अट मान्य न करणाऱ्या ब्रिक्स देशांवर १०० टक्के कर लागू केला जाईल. जे देश ही गोष्ट मान्य करणार नाहीत त्यांच्यासाठी अमेरिकन मार्केटचे (बाजार) दरवाजे बंद होतील. त्यांनी नवं मार्केट शोधावं. मार्केटसाठी तुमच्यासारखेच इतर देश शोधा. ब्रिक्स देश आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलरऐवजी इतर कोणत्याही चलानाला प्राधान्य देतील असं मला वाटत नाही”.

ट्रम्प यांची ब्रिक्स देशांना थेट धमकी

डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी देखील ब्रिक्स देशांना इशारा दिला होता. ते म्हणाले होते ब्रिक्स देशांनी अमेरिकेविरोधात धोरणं आणली तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. या देशांनी अमेरिकेच्या हिताविरोधात काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढेही हे देश असेच वागत राहिले तर त्यांच्याबरोबर जे काय घडतंय पाहा. ते देश आनंदी राहू शकणार नाहीत, अश इशारा ट्रम्प यांनी दिला. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प सर्वात आधी त्यांच्या ओव्हल कार्यालयात दाखल झाले. तिथे त्यांनी अनेक कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केली. यावेळी त्यांनी ब्रिक्स देशांना धमकावलं. ते म्हणाले, “ब्रिक्स देशांनी अमेरिकेविरोधात धोरणं आणण्याचा नुसता प्रयत्न केला तरी त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील”.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Donald trump warns brics over move against dollar says find another sucker nation for market asc