पाकिस्तानच्या दुर्गम भागात अमेरिकी सैन्य दलाने गुरुवारी केलेल्या ड्रोन हल्ल्यात १६ दहशतवादी ठार झाले. अमेरिकेने पाकिस्तानातील ड्रोन हल्ले पाच महिन्यांपूर्वी बंद केले होते. मात्र आता ते पुन्हा सुरू करण्यात आल्याचे अमेरिकी सैन्य दलाकडून सांगण्यात आले. उत्तर वझिरिस्तानातील दांडे दारपाखल भागात गुरुवारी सकाळी केलेल्या ड्रोन हल्ल्यात १० दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. बुधवारी रात्रीही या भागात ड्रोन हल्ले करण्यात आले होते, त्यात सहा जणांचा मृत्यू झाला होता.
संग्रहित लेख, दिनांक 13th Jun 2014 रोजी प्रकाशित
अमेरिकी ड्रोन हल्ल्यात १६ दहशतवादी ठार
पाकिस्तानच्या दुर्गम भागात अमेरिकी सैन्य दलाने गुरुवारी केलेल्या ड्रोन हल्ल्यात १६ दहशतवादी ठार झाले.
First published on: 13-06-2014 at 12:32 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drone strike in pakistan days after airport attack sources say