कर्नाटक राज्यात येत्या ५ मे रोजी विधानसभेच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. निवडणूक आयोगाने याची बुधवारी घोषणा केली. या निवडणुका एकाच टप्प्यात होणार असून ८ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.एस.संपत यांनी याबाबत तपशीलवार घोषणा करताना कर्नाटक राज्यात आचारसंहिता लागू झाल्याचे स्पष्ट केले. याबाबतची अधिसूचना १० एप्रिल रोजी जारी करण्यात येणार असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १७ एप्रिल घोषित करण्यात आली आहे.
उमेदवारी अर्जाची छाननी १८ एप्रिल रोजी करण्यात येणार असून अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २० एप्रिल असेल, असे संपत यांनी सांगितले. २२४ जणांच्या कर्नाटक विधानसभेत एकूण ४ कोटी १८ लाख मतदार आहेत.
विद्यमान विधिमंडळाचा कालावधी ३ रोजी संपुष्टात येणार असून गैरप्रकार टाळण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. निवडणुकांबाबत कोणतीही तक्रार नोंदवायची झाल्यास, १९५० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election on 5th may in karnataka