Jammu Kashmir : जम्मू आणि काश्मीरच्या अवंतीपोरा भागातील नादेर, त्राल येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गुरूवारी चकमक झाल्याची घटना समोर आली आहे. दक्षिण काश्मीरमध्ये गुरुवारी सकाळी झालेल्या या चकमकीत एका अज्ञात दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे.
दहशतवाद्यांबद्दल गुप्त माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी सकाळी ही कारवाई सुरू करण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की, दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथील नादेर गावाला सैन्याच्या संयुक्त पथकाने वेढा घातला आहे.
सुरक्षा दलाच्या पथकाकडून कारवाई केली जात असताना लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर बेछूट गोळीबार केला. या हल्ल्याला सुरक्षा दलाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. या चकमकीत एक अज्ञात दहशतवादी ठार झाला, पण अद्याप या दहशतवाद्याचा मृतदेह ताब्यात घेणे बाकी आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या दहशतवाद्यांविरोधात मोहिम सुरू आहे. सुरक्षा दलाकडून परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेणे सुरू आहे.
‘
#Encounter has started at Nader, Tral area of #Awantipora. Police and security forces are on the job. Further details shall follow.@JmuKmrPolice
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) May 15, 2025
#WATCH | J&K | Encounter underway at Nader, Tral area of Awantipora. Police and security forces are carrying out the operation. Details awaited.
— ANI (@ANI) May 15, 2025
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/sn92x3MfiN
यापूर्वी तीन दहशतवादी ठार
दरम्यान यापूर्वी लष्कर-ए-तैयबाच्या तीन दहशतवाद्यांना दक्षिण काश्मीरच्या शोपियांना येथे मंगळवारी ठार करण्यात आले होते. या लष्कर-ए-तैयबाशी संबंधित तीन दहशतवाद्यांपैकी दोन जणांची ओळख पटल्याची माहिती देण्यात आली आहे, असे वृ्त्त एनआयएने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. जम्मू काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात केलरच्या शुक्रू भागातील जंगलात हे तीन दहशतवादी ठार झाले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या पैकी एक दहशतवादी हा शोपीयान येथील छोटीपोर हीरापोरा येथील रहिवासी आणि मोहम्मद युसूफ कुट्टे याचा मुलगा शाहिद कुट्टे हा होता.
हा दहशतवादी लष्करचा कॅटेगरी अ ऑपरेटीव्ह होता, तसेच ८ एप्रिल २०२४ रोजी श्रीनगरच्या डॅनिश रिसॉर्ट येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेत सहभागी होता. या घटनेत दोन जर्मन पर्यटक आणि एक चालक जखमी झाला होता. तो ८ मार्च २०२३ मध्ये दहशतवादी संघटनेत सामील झाला होता.
तसेच कुट्टे हा १८ मे २०२४ मध्ये हीरापोरा येथे भाजपा सरपंचाच्या हत्येमध्ये देकईल सहभागी होता. तसचे ३ फेब्रुवारी २०२५ मध्ये कुलगाममधील बेहिबाग येथे एका टेरीटोरीयल आर्मी जवानाच्या हत्तेत सहभागी असल्याचाही संशय आहे.
तर इतर दोन दहशतवादी हा शोपियान मधील वंदना मेल्होरा येथील रहिवासी मोहम्मद शाफी दार याचा मुलगा अदनान शाफी दार हा होता. तो १८ ऑक्टोबर २०२४ मध्ये दहशतवादी संघटनेत सहभागी झाला. शोपियानच्या वाची येथे १८ ऑक्टोबर २०२४ रोजी एका बाहेर राज्यातील कामगाराच्या हत्येमध्ये तो सहभागी होता. तिसर्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही.