खादीचे लेबल लावून सुती कपड्यांची विक्री केल्याप्रकरणी ‘फॅब इंडिया’ला कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे. S मात्र, ‘फॅब इंडिया’कडून खादीच्या नावाखाली सुती कपड्यांची विक्री सुरू असून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खादी व ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी) फॅब इंडियाला कायदेशीर नोटीस पाठविली आहे. या नोटीसला १५ दिवसात समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यास फॅब इंडियावर कारवाई करण्याचा इशाराही आयोगाकडून देण्यात आला आहे. खादी व ग्रामोद्योग आयोग ही सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारितील स्वायत्त यंत्रणा आहे. दरम्यान या सगळ्यावर प्रतिक्रिया देताना आयोगाचे अध्यक्ष व्ही.के. सक्सेना यांनी म्हटले की, आम्ही आमची प्रतिष्ठा जपण्याच्याबाबतीत फार जागरूक आहोत. त्यामुळे या सगळ्याशी संबंधित ग्रामीण कारागीरांच्या फायद्यासाठी बनिवण्यात आलेल्या कायद्यांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे सक्सेना यांनी सांगितले. भारतातील खादीचा व्यापार आणि खादी उत्पादनांच्या विक्रीसाठी खादी चिन्ह नियमन कायदा २००३ व खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या कायद्यातंर्गत काही नियम आखून देण्यात आले आहेत. याअंतर्गत खादीच्या कोणत्याही उत्पादनावर ‘खादी मार्क’ असल्याशिवाय उत्पादनांची विक्री करता येत नाही.
Notice asks FabIndia to explain position in 15 days failing which KVIC will proceed against it for violation of Khadi Mark Regulation.
— ANI (@ANI) February 13, 2017
Notice asks FabIndia to explain position in 15 days failing which KVIC will proceed against it for violation of Khadi Mark Regulation.
— ANI (@ANI) February 13, 2017
खादीचे उत्तम कपडे मिळण्यासाठी फॅब इंडियाची दालने अनेकांना सुपरिचित आहेत. परंतु, आता फॅब इंडियाला पाठविण्यात आलेल्या नोटीसमुळे ग्राहकांच्या मनात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. फॅब इंडियाच्या दालनांमध्ये मिळणाऱ्या कपड्यांवर फॅब इंडिया कॉटन असा टॅग असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. त्याची गंभीर दखल घेऊन खादी व ग्रामोद्योग आयोगाने कंपनीचे सीईओ विनय सिंह यांना कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. यासंदर्भात फॅब इंडियाचे सीईओ विनय सिंह यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्याला नोटीस मिळाल्याचे मान्य केले. मात्र, दोन्हीकडच्या अधिकाऱ्यांची एक बैठक झाल्यास सर्व शंकांचे निरसन करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.