अयोध्येत २२ जानेवारीच्या दिवशी राम मंदिराच्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख डॉ. इमाम उमेर अहमद इलियाची यांचीही उपस्थिती होती. त्यांच्या या निर्णयामुळे कट्टरपंथीयांनी त्यांच्याविरोधात फतवा जारी केला आहे. तसंच फोनवरुन त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली जात आहे. त्यावर, “मी फतवा मानत नाही, काहीही झालं तरीही मी माफी मागणार नाही. ज्यांना अडचण असेल त्यांनी खुशाल पाकिस्तानात जावं.” असं इलियासी यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ इमाम उमेर अहमद इलियासी म्हणाले माझ्या हातात तो फतवा आहे जो माझ्या विरोधात आहे. मला रामजन्मभूमी ट्रस्टने प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण पाठवलं होतं. मी त्या निमंत्रणाचा स्वीकार केला. तसंच मी दोन दिवस विचार केला आणि ठरवलं की आपण या सोहळ्याला गेलं पाहिजे. आपल्या देश हिताच्या दृष्टीने हे सौहार्दाचं वातावरण होईल. हा विचार करुनच मी कार्यक्रमाला गेलो होतो. मला माहीत होतं की मला विरोध केला जाईल. मी मुख्य इमाम असल्याने मी या सोहळ्याला उपस्थित राहिलो. मी विचार करुन हा निर्णय घेतला कारण माझ्या दृष्टीने हा मोठा निर्णय होता. मी त्यानंतर अयोध्येला गेलो तेव्हा माझं स्वागत झालं. साधू संतांनीही मला आदर दिला. मी तिथून प्रेमाचाच संदेश दिला. मी म्हटलं होतं, आपल्या जाती, पंथ, धर्म, पूजा करण्याच्या पद्धती वेगळ्या असू शकतात. पण सर्वात मोठा धर्म माणुसकीचा आहे. भारतात राहणारे सगळे भारतीय आहोत असं मी म्हटलं आहे. देशातल्या सोशल मीडियाने आणि माध्यमांनी याला प्रसिद्धी दिली. त्यानंतर माझ्याविरोधात फतवा देण्यात आला. असं इमाम इलियासी म्हणाले आहेत.

माझ्या विरोधात तिरस्काराचं वातावरण तयार केलं जातं आहे. मला आणि माझ्या कुटुंबीयांना शिव्या दिल्या जात आहेत. काही फोन आले त्यांनी मला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. रात्री एक फतवा जारी झाला आहे. हुसैनी कास्मी नावाचे एक गृहस्थ आहेत. मी त्यांना ओळखत नाही पण मला हा फतवा आला आहे. त्यात माझा मोबाईल क्रमांक आहे जो संपूर्ण देशातल्या लोकांना दिला आहे. त्यांनी म्हटलं आहे मी माफी मागावी आणि राजीनामा द्यावा किंवा परिणामांना तयार रहावं. जे चार मुद्दे मांडलेत त्यातला एक मुद्दा हा आहे की तुम्ही प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला का गेलात? तुम्ही मुख्य इमाम आहात तुम्हाला जाण्याचा अधिकारच नाही. दुसरा मुद्दा हा उपस्थित केला की माणुसकी कुठल्याही धर्मापेक्षा मोठी आहे हे तुम्ही म्हणाला आहात हा तुमचा अपराध आहे असंही या फतव्यात म्हटलं गेलं आहे. तिसरा मुद्दा हा आहे की धर्मापेक्षा राष्ट्र मोठं आहे असं म्हटलं आहे त्यामुळेही फतवा दिला गेला आहे. कुफ्त का फतवा असं यात म्हटलं आहे. मी त्यांना हे सांगू इच्छितो हा इस्लामिक देश नाही. हा भारत देश आहे, इथे विविधेत एकता आहे. जर या लोकांना माझ्या प्रेमाच्या संदेशाबाबत काही त्रास असेल, मी राष्ट्रासह उभा आहे ही त्यांना माझी चूक वाटत असेल तर त्यांनी खुशाल पाकिस्तानात जावं असं इलियासी यांनी म्हटलं आहे. जे माझा तिरस्कार करतात त्यांनी पाकिस्तानात निघून जावं. मी कुठलाही अपराध केलेला नाही. मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे, मी झुकणार नाही, माफी मागणार नाही असंही इलियासी यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fatwa against imam umer ahmed ilyasi who attended ram mandir pran pratishtha ceremony in ayodhya scj