अवकाशातील शेती हा आता विज्ञान कथा-कादंबऱ्यातील विषय उरलेला नाही. आतापर्यंत गहू व लेटय़ूसची लागवड तेथे यशस्वी झाली आहे, पण त्या सूक्ष्म गुरूत्वाच्या वातावरणात कधी फूल उमलू शकेल अशी आशा नव्हती. पण ते आशेचे फूल अखेर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात उगवले असून त्याचे छायाचित्र अमेरिकी अवकाशवीर स्कॉट केली यांनी ट्विटरवर पाठवले आहे. नारिंगी रंगाचे हे फूल झिनियाचे असून त्याला तेरा पाकळ्या आहेत. आता तेथे फुलझाडाची लागवड यशस्वी झाल्याने यापुढे टोमॅटोच्या लागवडीचा मार्ग सुकर झाला असून ताजे रसरशीत टोमॅटो अवकाशवीरांना तिथल्या तिथे उपलब्ध होऊ शकतील.
अवकाशात उमललेले पहिले फूल होण्याचा मान झिनियाने पटकावला असून नासाने वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे, अवकाशात इतरही सजीव असू शकतात, असे अवकाशवीराने ट्विट संदेशात म्हटले आहे. या फुलझाडाची लागवड अर्थातच सौंदर्याच्या आधारावर नव्हती, तर सूक्ष्मगुरूत्वाला वाढ होऊ शकणारी प्रजात म्हणून ही निवड केली होती, असे नासाच्या आधीच्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. अवकाशातील शून्य गुरूत्वाला वनस्पतींना फुले येऊ शकतात का, असा प्रश्न होता व ती शंका आता दूर झाली आहे. पण आता अवकाशवीरांचा उत्साह वाढला आहे. हे फूल अवकाशात फुलणे म्हणजे त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाची घटना आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झिनियाचे महत्त्व
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात भाज्यांची लागवड करण्याची सुविधा आहे, पण फुलझाडे वाढवण्याचा प्रयोग प्रथमच यशस्वी झाला आहे. झिनिया ही वनस्पती पर्यावरणीय घटकांना संवेदनशील आहे. ६० ते ८० दिवस हा तिचा वाढीचा कालावधी आहे, पण ती अवकाशात सूक्ष्म गुरूत्वाला वाढवणे फार अवघड असते व फूल येणे तर कठीणच मानले जात होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First flower to bloom in space