अमृतसरच्या खासा गावात एका बीएसएफ जवानाने आपल्या साथीदारांवर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या घटने सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) पाच जवान शहीद झाले आहे. ही घटना आज रविवारी घडली. अमृतसरमधील बीएसएफ मेसमध्ये कथित गोळीबार करणारा बीएसएफ कॉन्स्टेबल देखील मृत झाल्याचे वृत्त आहे. जखमींपैकी एका जवानाची प्रकृती चिंताजनक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आतापर्यंत चार बीएसएफ जवानांचे मृतदेह रुग्णालयात नेण्यात आले आहेत. या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

बीएसएफ अधिकार्‍यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “६ मार्च रोजी मुख्यालय १४४ बीएन खासा, अमृतसर येथे सीटी सत्तेप्पा एसके यांनी केलेल्या गोळीबाराच्या दुर्दैवी घटनेत ५ बीएसएफ जवान जखमी झाले होते. सीटी सत्तेप्पा एसके देखील या घटनेत जखमी झाले. ६ जखमींपैकी सीटी सत्तेप्पासह ५ जणांना जीव गमवावा लागला आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. या घटनेच्या तपासासाठी न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.”

दरम्यान, सर्व जखमींना गुरु नानक देव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five bsf soldiers killed in punjabs khasa hrc