Firing at Imran Khan’s Rally in Wazirabad : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीवर गोळीबार झाला आहे. या गोळीबारात इम्रान खान जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या पायाला जखम झाल्याचं सांगितलं जात आहे. गोळीबारानंतर एकच गदारोळ सुरु झाला होता. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्यांना अटक केली आहे. याबाबत जिओ न्यूजने वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने तातडीने निवडणूक घेण्याची मागणी करत लाहोर ते इस्लामाबाद ‘हकीकी आझादी मार्च’ नावाने महामोर्चा काढला आहे. पक्षाचे हजारो कार्यकर्ते खान यांच्यासह राजधानीकडे निघाले आहेत. ४ नोव्हेंबरला हा मोर्चा इस्लामाबादला पोहोचणार आहेत.

त्यातच आज ( ३ नोव्हेंबर ) ‘हकीकी आझादी मार्च’ हा मोर्चा वजिराबाद शहरात पोहचला. जफरअली खान चौकात हा मोर्चा आला असताना गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात इम्रान खान यांच्या पायाला दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत अन्य चार जण जखमी झाले आहेत.

हल्लेखोराने एके-४७ या बंदुकीतून गोळाबार केला आहे. गोळीबाळानंतर एकच गदारोळ उडाला होता. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. हल्ल्यानंतर इम्रान खान यांना बुलेटप्रूफ मोटारीतून तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं. पीटीआय पक्षाचे नेते फैसल जावेद हेही हल्ल्यात जखमी असल्याचे वृत्त आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former pakistan pm imran khan injured in firing during rally ssa