पीटीआय, लंडन
दक्षिण इटलीतील माटेरा शहरात झालेल्या रस्ते अपघातात चार भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती रोममधील भारतीय दूतावासाने सोमवारी दिली. या अपघाताबाबत दूतावासाने दु:ख व्यक्त केले आहे.
इटालियन वृत्तसंस्था ‘एएनएसए’ने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी आगरी व्हॅलीमधील माटेरा शहरातील स्कॅनझानो जोनिको नगरपालिकेत एका ट्रकला धडकलेल्या सात आसनी रेनॉल्ट सीनिकमधील अन्य सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांची ओळख पटविण्यात आली असून यात कुमार मनोज (३४), सिंग सुरजीत (३३), सिंग हरविंदर (३१) आणि सिंग जसकरण (२०) अशी मृतांची नावे आहेत. जखमींपैकी पाच जणांना पोलिकोरो (माटेरा) येथील रुग्णालयात हलवण्यात आले, तर गंभीर जखमी एका व्यक्तीला पोटेंझा येथील सॅन कार्लो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.