सध्या इंटरनेटवर रील्स बनवणाऱ्यांची संख्य प्रचंड वाढली आहे. सोशल मीडिया एफ्लुएन्सर्स व्हिडीओ-रीलसाठी अनेकदा स्वतःचा जीव देखील धोक्यात घालताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. बिहारच्या पूर्णिया येथे शुक्रवारी सकाळी जोगबनी-दानापूर वंदे भारत एक्सप्रेसने चार किशोरवयीन मुलांना चिरडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच किशोरवयीन मुले रेल्वे ट्रॅकजवळ येणाऱ्या ट्रेनचे रील (Reels) बनवत असताना ही धक्कादायक घटना घडली.

या घटनेत चार मुलांचा रुग्णालयात नेत असताना किंवा तेथे पोहोचल्यानंतर थोड्याच वेळात मृत्यू झाला, तर या घटनेत एक मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे.

नॉर्दर्न फ्रंटियर रेल्वेजचे चीफ पब्लिक रिलेशन ऑफिसर (सीपीआरओ) यांनी चार मुलांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. आम्हाला माहिती मिळली की आज पहाटे ४.५४ वाजता जोगबनी-दानापूरबी२६३९१ (वंदे भारत एक्सप्रेस)ने पुर्णिया आणि कसबा रेल्वे स्टेशनच्या मध्ये चिरडल्याच्या घटनेची माहिती मिळाली…. घटना घडली तेव्हा ते रुळावर सोशल मिडिया रील्स बनवत होते असा संय़ व्यक्त केला जात आहे.”

स्थानिक चौकीदार मोहम्मद हबीबुद्दीन यांनी सांगितले की, रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाल्याने तीन मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. इतर दोन मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण त्यापैकी एकाचा पोहोचल्यानंतर थोड्याच वेळात मृत्यू झाला. दरम्यान मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.