स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हैदराबादमध्ये पोलीसांनी चार संशयित दहशतवाद्यांना शुक्रवारी अटक केली. अटकेत असलेले चौघेही जण परदेशी नागरिक असून ते हुजी या संघटनेशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी दोघेजण बांगलादेशमधील असून, एक जण पाकिस्तानी तर एक जण म्यानमारमधील आहे. स्वातंत्र्य दिनी देशात घातपाती कारवाया करण्याचा त्याचा कट होता. पोलीसांनी या चौघांना अटक केल्यामुळे त्यांचा कट उधळला गेला आहे. जुन्या हैदराबादमधून या चौघांना अटक करण्यात आली. त्यांच्यासोबत आणखी कोणी दहशतवादी आहेत का, याच पोलीस कसून तपास करीत आहेत. देशभरात शनिवारी ६९ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व ठिकाणी कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Aug 2015 रोजी प्रकाशित
हैदराबादमध्ये चार दहशतवाद्यांना अटक
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हैदराबादमध्ये पोलीसांनी चार संशयित दहशतवाद्यांना शुक्रवारी अटक केली.

First published on: 14-08-2015 at 01:26 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four terrorist arrested in hyderabad