Gaza Peace Summit हमासने सात ओलीस नागरिकांना ‘रेड क्रॉस’कडे सोपवलं आहे. इस्रायल आणि हमास युद्धात युद्धविरामाच्या अंतर्गत सुटका करण्यात येणारे हे पहिलेच सात ओलीस नागरिक आहेत. त्यांची अवस्था नेमकी कशी आहे? हे अद्याप समजू शकलेलं नाही. हमासने सांगितलं आहे की इस्रायलने १९०० पॅलेस्टाईनींना सोडावं त्या बदल्यात आम्ही २० जिवंत ओलीस नागरिकांना सोडत आहोत. त्यापैकी सात जणांना आम्ही रेड क्रॉसकडे सोपवलं आहे. इस्रायली वृत्तवाहिन्यांनी जेव्हा बंधकांना रेड क्रॉसकडे सोपवण्याचं वृत्त आलं तेव्हा ओलीस ठेवण्यात आलेल्या नागरिकांच्या कुटुंबांना आनंद झाला आहे. सध्याच्या घडीला हजारो इस्रायली देशभरात सुटकेच्या बातम्या बघत आहेत.

रेड क्रॉस संस्थेच्या समितीकडे सात जणांना सोपवण्यात आलं

आंतरराष्ट्रीय मानवतावादी संघटना रेड क्रॉसच्या आंतरराष्ट्रीय समितीकडे या ओलिसांना सोपवण्यात आलं आहे. हमासने सोमवारी १९०० हून जास्त पॅलिस्टाईनी कैद्यांची यादी जाहीर केली होती. हमासने म्हटलं आहे की या युद्धकैद्यांना सोडलं पाहिजे. इस्रायल-हमास युद्धविरामाच्या अंतर्गत या ओलिसांना सोडण्यात आलं आहे. इस्रायलच्या २० ओलिसांना हमासने सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी सात जणांना सोडण्यात आलं आहे. इस्रायल विरुद्ध हमास यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. आता युद्धविराम होतो आहे. त्यामुळे सात जणांना सुरुवातीला सोडण्यात आलं आहे.

हमासने सोडलेल्या सात नागरिकांची नावं काय?

१) गॅली बर्मन
२) झिव बर्मन
३) एटियन अब्राहम मोर
४) ओमरी मिरान
५) मतन अँग्रेस्ट
६) अॅलोन ओहेल
७) गाय गिलोबा दलाल

७ ऑक्टोबर २०२३ ला हल्ला आणि युद्धाला सुरुवात

अशा सात ओलिसांना सोडण्यात आलं आहे. हमासने ७ ऑक्टोबर २०२३ ला इस्रायलवर हल्ला केला. त्यानंतर युद्ध सुरु झालं. या युद्धात आत्तापर्यंत १२०० लोक मारले गेले आहेत. तर २५० जणांना ओलीस ठेवण्यात आलं. दरम्यान स्थानिक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की युद्धात ६७ हजार पॅलेस्टाईनी मारले गेले आहेत. दरम्यान आता हमासने २० ओलीस नागरिकांना सोडण्याचा निर्णय घेतला. इस्रायलमध्ये या ओलिसांचं स्वागत करण्याची तयारी सुरु आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इतर नेत्यांसह तडजोडी आणि युद्ध विरामावर चर्चा सुरु होते आहे. युद्धामुळे लोकांना गाझामध्ये उपासमारीचा सामना करावा लागतो आहे. तर लाखो लोक बेघर झाले आहेत. हमासने सोमवारी २० जिवीत ओलिसांना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहूने आपल्या राजकीय स्वार्थासाठी युद्ध दीर्घकाळ सुरु ठेवलं असाही आरोप त्यांच्यावर झाले आहेत. मात्र त्यांनी हे आरोप खोडून काढले आहेत.