समाजात द्वेष पसरविणारी वक्तव्ये केल्याप्रकरणी अडचणीत आलेले भारतीय जनता पक्षाचे(भाजप) नेते गिरिराज सिंह यांना न्यायालयाने जामीन मंजूल केला आहे.
पटणा न्यायालयातील सत्र न्यायाधीश वीरेंद्र कुमार यांनी सिंह यांना जामीन मंजूर केला आहे. बिहार आणि झारखंड पोलिसांनी सिंग यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी धाड टाकल्यानंतर तासाभरातच सिंग यांनी तातडीने येथील जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.
‘मोदींना विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात निघून जावे,’ असे विधान झारखंडमधील देवघर जिल्ह्य़ात १९ एप्रिल रोजीच्या एका प्रचारसभेत बोलताना सिंग यांनी केले होत़े  या विधानाची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होत़े  त्यानुसार, सिंग यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Giriraj singh granted anticipatory bail