शहाजहॉंने ताजमहलसाठी निविदा काढली नाही, मग सरकारी कामांसाठी का काढू, असं विधान गोव्याचे मंत्री गोविंद गौडे यांनी केले आहे. गोवा फॉरवर्ड पार्टीचे आमदार विजय सरदेसाई यांनी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी हे विधान केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विजय सरदेसाईंकडून भ्रष्टाचाराचे आरोप

गोवा विधानसभेच्या अधिवेशानदरम्यान, प्रश्नउत्तराच्या तासाला गोवा फॉरवर्ड पार्टीचे आमदार विजय सरदेसाई यांनी गोवा सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. सरकारने कला अकादमीच्या कामासाठी कोणतेही निविदा न काढता ५६ कोटींची कामे कंत्राटदाराला दिली, असा आरोप त्यांनी सरकारवर केला.

मंत्री गोविंद गौडेंकडून उत्तर

विजय सरदेसाई यांच्या आरोपवर उत्तर देताना गोवा सरकारमधील मंत्री गोविंद गौडे विचित्र उत्तर दिले. ”ताजमहल बांधताना शहाजाहॉंने निविदा काढली नव्हती, मग मी सरकारी कामांसाठी का काढून असं ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, ”तुम्ही ताजमहलला भेट दिली असेल. १६३२ ते १६५३ दरम्यान त्याचं काम पूर्ण करण्यात आलं होतं. मात्र, आजही तो ताजमहल इतका सुंदर का दिसतो, असा प्रश्न तुम्हाल पडतो का? कारण ताजमहल बांधण्यासाठी शहाजहॉंने कोणतेही कंत्राट दिले नव्हते किंवा कोणतीही निविदा काढली नव्हती”

हेही वाचा – मध्यरात्री झालेल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंसह राष्ट्रवादीवर जोरदार टीका; म्हणाले “बगलेमध्ये धरुन मुंडी दाबत…”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goa minister govid gaude statement on tajmahal tendor during goa assembly session spb