राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र पीपीएफसह अन्य अल्प बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना केंद्र सरकाने गुडन्यूज दिली आहे. सरकारने ऑक्टोंबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी अल्प बचत योजनांवरील व्याजदरात ०.४ टक्के वाढ केली आहे. अल्प बचत योजनांवरील व्याजदरात दर तिमाहीत बदल होत असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनांवरील व्याजदरात ७.८,७.३ आणि ८.७ टक्के वाढ करण्यात आली आहे. पीपीएफ आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राचा व्याजदर आठ टक्के करण्यात आला आहे. सध्या हा व्याजदर ७.६ टक्के होता.

किसान विकास पत्रावर ७.७ टक्के व्याज देण्यात येईल. याआधी ७.३ टक्के व्याज मिळायचे. खास मुलींसाठी सुरु करण्यात आलेल्या सुकन्या समृद्धी योजनेवर ८.५ टक्के व्याज देण्यात येईल. याआधी हा व्याजदर ८.१ टक्के होता. त्यामध्ये ०.४ टक्के वाढ करण्यात आली आहे. एक ते तीन वर्षांच्या मुदत ठेवींवर ०.३ टक्के जास्त व्याज मिळणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government hikes interest rate on ppf other small savings