वृत्तसंस्था, गाझा, जेरुसलेम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य गाझामध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यामध्ये बुरेजी निर्वासितांच्या छावणीमधील घरे नष्ट झाली, अशी माहिती तेथील रहिवासी आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. या युद्धात आतापर्यंत ९,०६१ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला असून त्यामध्ये एक तृतीयांशपेक्षा जास्त म्हणजे ३,६०० पेक्षा जास्त लहान मुलांचा समावेश आहे. दुसरीकडे, युद्धसमाप्तीची चिन्हे दिसत नसल्यामुळे ते तात्पुरते तरी थांबावे यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर राजनैतिक प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना मानवतावादी दृष्टिकोनातून ‘विराम’ सुचवला आहे. 

इस्रायली रणगाडे व फौजा गुरुवारीच गाझा शहराकडे निघाल्या. मात्र, हमास आणि ‘इस्लामिक जिहाद’चे अतिरेकी गुरिल्ला पद्धतीने भुयारांमधून इस्रायली रणगाडय़ांवर हल्ले करत आहेत. इस्रायली फौजा अद्याप गाझा शहराच्या बाहेर आहेत. याचा अर्थ त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त तीव्रपणे प्रतिकार होत आहे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hamas unexpected resistance to israeli forces amy