Crime News : तमिळनाडूच्या चेन्नई येथे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एका ३४ वर्षीय होमिओपॅथी डॉक्टर सॅम्युएल एबेनेजर संपत याने आपल्या ३७ वर्षीय प्रेयसीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. प्रेयसीचे वडील सॅम्युअल शंकर (७८) यांच्या मृत्यूनंतर या दोघांमध्ये भांडण झाले होते. ज्यादरम्यान सिंथियाने वडीलांच्या मृत्यूबद्दल संपत याला जबाबदार धरले होते. यावरून दोघांमध्ये कडाक्याचा वाद झाला आणि संपत याने सिंथियाला धक्का देऊन खाली पाडले. पण पडल्यानंतर सिंथिया बेशुद्ध झाली आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरोपीने कायद्याच्या कचाट्यात अडकण्यापासून वाचण्यासाठी प्रेयसी आणि तिच्या वडीलांचा मृतगेह चार महिन्यांहून अधिक काळापर्यंत स्वतःच्या फ्लॅटमध्येच ठेवला. तसेच त्याने मृतदेहाची दुर्गंधी रोखण्यासाठी रसायनांचा वापर केला. गुरूवारी खूपच दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी घटनास्थळी गेल्यानंतर दोन मृतदेह ताब्यात घेतले. पोलिसांनी संपत याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संपत हा ऑस्ट्रियाचा रहिवासी आहे. तो सिंथिया आणि तिचे वडीलांबरोबर सप्टेंबर २०२४ पासून थिरुमुल्लाइवॉयल येथे एका अपार्टमेंटमध्ये राहत होते. संपत आणि सिंथिया सोशल मीडियाच्या माध्यामतून एकमेकांना भेटले होते. सिंथियाच्या वडीलांवर डायलिसिस उपचार सुरू होते, त्यामुळे त्यांना चांगले उपचार मिळावेत यासाठी दोघे त्याच्या चेन्नई येथील अपार्टमेंटमध्ये राहायला गेले.

काही महिन्यांपूर्वी जेव्हा शंकर यांचा किडनी फेल झाल्याने मृत्यू झाला तेव्हा सिंथियाने संपत याला त्यासाठी जबाबदार ठरवले. संपत हा परदेश प्रवासाचे प्लॅनिंग करत होता पण सिंथिया आणि त्याच्यामध्ये वाद झाले आणि सिंथियाने संपतला सोडून देण्यास नकार दिला. यामुळे दोघांमध्ये वाद विकोपाला केला. यादरम्यान संपत याने सिंथियाला ढकलून दिले, ज्यानंतर ती खाली पडली आणि बेशुद्ध झाली. त्यानंतर काही वेळाने तिचा मृत्यू झाला.

संपत यांने कुजत चाललेल्या मृतदेहांची दुर्गंधी झाकून टाकण्यासाठी, तसेच मृतदेह कुजू नयेत म्हणून कुठलेतरी केमिकल्स वापरले. तसेच त्याने दुर्गंधी बाहेर पसरू नये यासाठी अपार्टमेंटमधील एसीही चालू करून ठेवले. त्यानंतर त्याने अपार्टमेंटचे दार लावून घेतले आणि तो शहर सोडून गेला. या घटनेनंतर तो काँचीपुरम येथे आपल्या नातेवाईकांबरोबर राहू लागला होता.

खुलासा कसा झाला?

आठवडाभरापासून कसलीतरी दुर्गंधी येत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. याबद्दल पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी त्यांना कुजलेल्या अवस्थेत दोन मृतदेह आढळून आले. यानंतर मृतदेह शव विच्छेदनासाठी शासकिय किलपौक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पाठवण्यात आले. तसेच सॅम्युएल एबेनेजर याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात सिंथियाच्या हत्येचा गु्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Homeopath doctor murders girlfriend hide dead body using chemicals for 4 months in chennai marathi news rak