महात्मा गांधी यांच्या साबरमती आश्रमास भेट देऊन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या दोन दिवसीय गुजरात दौऱयाची सुरूवात केली. यावेळी “गांधीजींच्या आश्रमात येणे ही माझ्यासाठी मानाची गोष्ट आहे. मी गांधीजी आणि त्यांच्या विचारांचा अनुयायी आहे. धन्यवाद!” असे राहुल गांधींनी यास्थळाला भेट देणाऱयांसाठी ठेवण्यात आलेल्या पुस्तिकेवर लिहीले.
अहिंसावाद आणि दांडी यात्रेचा साक्षीदार असलेल्या साबरमती आश्रमात राहुल गांधी यांनी अर्धा तास व्यतित केला. त्यानंतर राहुल गांधी अहमदाबाद व राजकोट येथील पक्ष नेत्यांशी संवाद साधणार असून त्यांना आगामी निवडणुकांबद्दल मार्गदर्शन करणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Oct 2013 रोजी प्रकाशित
‘मी गांधीवादाचा अनुयायी’
गांधीजींच्या आश्रमात येणे ही माझ्यासाठी मानाची गोष्ट आहे. मी गांधीजी आणि त्यांच्या विचारांचा अनुयायी आहे. धन्यवाद!

First published on: 03-10-2013 at 02:34 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I am follower of mahatma gandhi and his ideas rahul gandhi