राहुल गांधी (Rahul Gandhi) हे काँग्रेसचे(Congress) नेते आहेत. त्यांनी पक्षाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचं नेतृत्व केलं. पण त्यांना ५४५ सदस्य असणाऱ्या लोकसभेत केवळ ५२ जागा जिंकता आल्या. विशेष म्हणजे राहुल गांधी यांना अमेठी मतदारसंघात भाजपा नेत्या स्मृती इराणींकडून पराभव पत्करावा लागला होता.
पण केरळमधील वायनाडमधून ते विजयी झाले. राहुल गांधी यांनी २००४ मध्ये राजकारणात अधिकृतरित्या प्रवेश केला. २००७ साली त्यांना पक्षाचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती देण्यात आली होती.
तर जानेवारी २०१३ मध्ये त्यांच्याकडे पक्षाचे उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. डिसेंबर २०१७ मध्ये त्यांनी त्यांची आई सोनिया गांधी यांच्याकडून काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. Read More
काँग्रेसचे खासदार गांधी सातत्याने सामान्य लोकांमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, राहुल यांनी गुरुवारी दिल्लीत हमालांबरोबर…