चैतन्यानंद सरस्वती या स्वयंघोषित बाबाला पोलिसांनी १७ मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणात अटक केली आहे. मागील दोन महिन्यांपासून हा बाबा फरार होता. त्याला शोधण्यासाठी पोलिसांची पथकं कार्यरत होती. आग्रा या ठिकाणी असलेल्या एका हॉटेलमधून या स्वयंघोषित बाबाला अटक करण्यात आली. दरम्यान या प्रकरणात आता नव्या गोष्टी समोर येत आहेत. एका तरुणीने सांगितलं आहे की ती या चैतन्यानंदच्या संस्थेकडून चालवण्यात येत असणाऱ्या महाविद्यालयात प्रवेश घेणार होती. पण तिने ते टाळलं.

तरुणीने काय सांगितलं?

दिल्लीतल्या मॅनेजमेंट इन्स्टिट्युटमध्ये मी प्रवेश घेणार होतो. पण खरंच नशीब चांगलं म्हणून मी तिकडे प्रवेश घेतला नाही. मी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात चैतन्यानंद संचालक असलेल्या इन्स्टिट्युटमध्ये प्रवेश घ्यायला गेले होते. त्यावेळी चैतन्यानंद मला भेटला होता त्याने मला इंटर्नशिप देईन असंही आश्वासन दिलं होतं. मी तिथे माझी सगळी शैक्षणिक कागदपत्रं घेऊन गेले होते. मला त्या बाबाने आर्थिक मदत देण्याचंही मान्य केलं. तसंच तुला परदेशात पाठवेन असंही मला त्याने सांगितलं. मी आयपीएस ऑफिसर्सना ट्रेनिंग दिलं आहे असंही या बाबाने मला सांगितलं होतं. त्याने माझ्यावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला. असंही या तरुणीने एनडीटीव्हीने सांगितलं.

या तरुणीने सांगितलं माझ्यावर बाबाने दबाव टाकण्याचा प्रयत्न केला

या मुलीने सांगितलं बाबाने त्यावेळी माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तू आजच्या आज प्रवेश घे असं मला सांगण्यात येत होतं. त्यांनी मला विचार करायलाही फार वेळ दिला नाही. तू प्रवेश घे आम्ही तुझा प्रवेश निश्चित करतो. मी तिथून माझ्या वडिलांना आणि आईला फोन केला. त्यांनीही मला हेच म्हटलं की इतक्या तातडीने सगळं का ठरवत आहेस? थोडा विचार कर. तंसच मला दोघांनीही सांगितलं की इतकी घाई करत असतील तर प्रवेश घेऊ नकोस. मी प्रवेश घेतला नाही आणि मी वाचले असं या मुलीने सांगितलं. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

मला खुश कर असंही या बाबाने सांगितलं, तो अनुभव विचित्र होता

या मुलीने आणखी एक अनुभव सांगितला. चैतन्यानंद म्हणाला मला तू खुश कर, मला तुझ्याकडे आकर्षित कर असं सांगितलं ती बाब मला मुळीच पटली नाही. माझ्या आई वडिलांनी मला तातडीने सांगितलं की तू तिथून निघ. लोक उपस्थित असताना मला त्याने प्रश्न विचारला होता आणि त्याला खुश करायला सांगितलं होतं. मी त्याला सांगितलं की मी इथे अभ्साय करायला आले आहे. त्यानंतर मी तिथून निघून गेले असंही या तरुणीने सांगितलं.