भारतीय हवाई दलाला आज ( ३ सप्टेंबर ) नवीन ताकद मिळाली आहे. भारतीय हवाई दलात स्वदेशी बनावटीचे लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर ( एलसीएच ) दाखल झालं आहे. ‘प्रचंड’ असे या हेलिकॉप्टरचे नाव आहे. राजस्थानमधील जोधपूर येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत या १० हेलिकॉप्टरची पहिली तुकडी भारतीय हवाई दलात सामील झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी बोलताना राजनाथ सिंह यांनी म्हटलं की, “अनेक दिवसांपासून या हेलिकॉप्टरची प्रतिक्षा होती. १९९९ साली झालेल्या कारगिल युद्धातही या हेलिकॉप्टरची कमतरता भासली. ‘प्रचंड’ हेलिकॉप्टर हे दोन दशके करण्यात आलेल्या संशोधनातून निर्माण झालं आहे. शत्रूला चकमा देण्यासाठी हेलिकॉप्टर सक्षम आहे. मोठ्या प्रमाणात दारुगोळा घेऊन ते तात्काळ घटनास्थळी दाखल होऊ शकते,” असेही राजनाथ सिंह यांनी सांगितलं.

प्रचंड हेलिकॉप्टरची वैशिष्टे

  • प्रचंड हेलिकॉप्टरची निर्मिती हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने केली आहे.
  • अन्य लढाऊ हेलिकॉप्टरच्या तुलनेत प्रचंड हलक्या वजनाचे आहे. त्याचे वजन ५.८ टन एवढे असून, अनेक हत्यांरासह त्याचे परिक्षण करण्यात आलं आहे.
  • हे हेलिकॉप्टरचा वेग ताशी २७० किलोमीटर असा आहे. त्याची लांबी ५१.१ फूट असून, उंची १५.५ फूट आहे.
  • प्रचंड हेलिकॉप्टरमध्ये ‘स्टेल्थ’ नावाची आधुनिक प्रणाली आहे. त्यामाध्यमातून शत्रूच्या रडारवर देखील हे हेलिकॉप्टर दिसू शकत नाही. त्याचप्रमाणे रात्रीच्यावेळी हल्ला करण्याची क्षमताही यात आहे.
  • प्रचंड हेलिकॉप्टर १६,४०० फूट उंचीवरून सुद्धा शत्रूवर हल्ला करू शकते.
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iaf induct first made in india light combat helicoprters prachand ssa
First published on: 03-10-2022 at 13:23 IST